:- शैलेंद्र खैरमोडे
पैठण पोलीसांची कामगिरी जबरी चोरी , जिनिंग चोरी आणि ॲटो रिक्षा मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांची उकल पोलीस स्टेशन पैठण हद्दीत तसेच पैठण शहरामध्ये चोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आणि दाखल गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मा.पोलीस अधीक्षक श्री . मनिष कलवानिया यांनी दिलेल्या सुचना आणि मार्गदशनाप्रमाणे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी आपले अधिनस्त अंमलदार यांना कामकाज करण्याचे आदेश देवुन त्याप्रमाणे कामकाज करुन पोलीस स्टेशन पैठण हद्दीत घडलेल्या पैठण पाचोड रोडवरील श्रीनाथ जिनिंग येथे घडलेल्या चोरी प्रकरणी दाखल गुन्हयामध्ये आरोपी १ ) अशपाक छोटेखाँ पठाण , २ ) विनोद अशोक साळवे ३ ) सोनु पुंडलिक पोळ यांना ताब्यात घेवुन अटक करुन त्यांना मा . न्यायालयातुन तीन दिवस पी . सी . आर . मिळाल्यानंतर पी . सी . आर . काळात आरोपीतांकडे बारकाईने तपास करुन गुन्हयातील गेला माल मॅन्युफॅक्चर लाईनवर असलेले प्रेसिंग वेट चे ० ९ नग जप्त करण्यात आले असुन ईतर साथीदारांचा देखील समावेश असल्याचे तसेच पैठण शहागड रोडवरील सदगुरु जिनिंग येथे आणि संत एकनाथ गार्डन पैठण येथील कंपाऊंडची जाळी चोरी केल्याचे घटनांमध्ये देखील आरोपींताचा सहभाग निष्पन्न झाले आहे . आरोपीतांनी केलेले ०३ गुन्हे उघडकीस आले असुन त्यांच्याकडे तपासकामध्ये आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे . तसेच ०८/०८/२०२२ रोजी प्रॉपर पैठण येथुन अॅटो रिक्षा आणि मोटार सायकल चोरी घटना घडल्याने दाखल गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी १ ) ईश्वर शेषराव भालके , २ ) ओकांर संतोष गर्दे , ३ ) यश किशोर डोंगरे यांना अटक करुन तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले आणि त्यांच्याकडुन चोरीचे गेलेले ॲटो रिक्षा आणि मोटार सायकल असा एकुण ७१,००० / - हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन त्यांनी केलेले ०२ गुन्हे उघडकीस आले आहेत . तसेच दिनांक ०८/०८/२०२२ रोजी संत एकनाथ मंदिर येथे एका व्यक्तीकडे जबरी चोरी करुन त्याचा १४६०० रुपयाचा मोबाईल आणि रोख ७०० रुपये काढुन नेणारे दोन जण १ ) अशपाक युनुस शेख २ ) सिद्धार्थ शिवलाल गायकवाड यांना अटक करुन त्यांच्याकडुन गुन्हयातील गेला मोबाईल व रोख रक्कम असे एकुण १५,३०० / - रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . तसेच मागील काही दिवसांपूर्वी तुळजापुर शिवरामध्ये कॅनॉलच्या रस्त्याने जाणाऱ्या वाटसरुस मोटार सायकवरुन येवुन कोयात्याने मारहाण करुन रोख रक्कम व मोबाईल घेवुन फरार झालेला आरोपी शहारुख ऊर्फ शऱ्या अमया ऊर्फ अबरश्या पवार यास देखील अटक करुन त्याच्या कडुन गुन्हयात गेला मला रोख रुपयापासुन बनवलेले चांदीचे कडे , वापरलेले हत्यार कायेता आणि गुन्हामध्ये वापरलेली बुलढाणा जिल्हयातुन सिंदखेड राजा पोलीस स्टेशन हद्दीतुन चोरी करुन आणलेली ६० हजार रुपायाची यमाहा कंपनीची एफ.झेड . एस . मोटारसायकल असा एकुण ६३,००० / - रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . अशा प्रकारे एकुण ० ९ आरोपीतांना विविध गुन्हयात अटक करुन त्यांच्याकडे तपासामध्ये पोलीस स्टेशनला दाखल झालेले एकुण ०७ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आलेले आहे . सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा . श्री . मनिष कलवानिया , अपर पोलीस अधीक्षक पवन बन्सोड , औरंगाबाद ग्रामिण उपविभागीय पोलीस अधिकारी पैठण श्री . डॉ . विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार , पोलीस उप निरीक्षक सतिष भोसले , दशरथ बुरकुल , सफौ संजय मदने , अजिज शेख , पोहेकॉ श्रीराम चेडे , महेश माळी , सुधीर ओव्हाळ , नुसरत शेख , पोलीस नाईक भगवान धांडे , नरेंद्र अंधारे , गोपाल पाटील , भाऊसाहेब ठोकळ , पोकॉ मुज्जसर पठाण , स्वप्निल दिलवाले , अंकुश शिंदे , भाऊसाहेब वैदय आदी यांनी केली आहे .