.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या विचारांच्या प्रेरनेतून मानव सेवेलाच ईश्वरसेवा मानून देवस्थानाचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत व विश्वस्थमंडळाच्या मार्गदर्शनात संत भोजाजी महाराज देवस्थाचा प्रवास
धार्मिकतेकडून सामाजिक दायित्वाकडे सुरु असल्याने वाहन अपघातात गंभीर झालेल्या शरद पवार यांना
संत भोजाजी महाराज देवस्थाच्या वतीने वैद्यकीय उपचारासाठी वेळीच आर्थिक मदत मिळाल्याने जीवदान मिळाले आहे,
  आजनसरा ग्रा.पं अंतर्गत येणाऱ्या सोनेगाव (राऊत)येथील शरद दत्तूजी पवार हे यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे मोटर सायकल ने जात असतांना वाहन अनियंत्रित होऊन मोठा अपघात झाला, त्यात शरद पवार गंभीर झाल्याने सुरवातीला चंद्रपूर येथील डॉ. वैभव भोयर यांच्या यशोधन हेल्थकेअर हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु प्रकुर्ती गंभीर असल्याने, शासकीय रुग्णालय चंद्रपूर, नागपूर, कस्तुरबा गांधी हॉस्पिटल सेवाग्राम, आचार्य विनोबा भावे रुग्नालय सावंगी मेघे, व हिंगणघाट येथील खाजगी
रुग्णालयात उपचार करण्यात आले, पवार यांची आर्थिक परिस्थिती अत्यन्त गरिबीची असून भूमिहीन आहे, रोजमजुरी व झाडू विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह केल्या जातो,
 त्या मुळे शरद यांच्यावर पुढील उपचार करने शक्य होत नसल्याने शरद यांची पत्नी राखी पवार व वडील दत्तूजी पवार यांनी आजनसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थानचे अध्यक्ष माजी पं.स.सदस्य डॉ. विजय पर्बत यांची भेट घेऊन आपबीती सांगताच त्यांनी तातडीने विश्वस्थ मंडळाची
मंजुरी घेऊन देवस्थानच्या  वतीने विस हजार रुपयांचा धनादेश देण्यात आल्याने शरद यांच्यावर पुढील उपचार करने शक्य झाल्याने जीवदान मिळाले  असून अध्यक्ष डॉ. विजय पर्बत व विश्वस्थमंडळाच्या मार्गदर्शनात संत भोजाजी महाराज देवस्थानची वाटचाल धार्मिकतेकडून  सामाजिक दायित्वाकडे सुरु आहे,
 धनादेश देतांना अध्यक्ष डॉ.विजय पर्बत, सचिव शिवदासजी पर्बत, गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम चे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे  संत भोजाजी महाराज विश्वस्त मंडळातील धनराजजी मेश्राम, राजेंद्र ढवळे, नामदेव गाढवे, रमेश ठाकरे, रामाजी कोपरकर, विनोद आष्टनकर, श्रावण काचोळे, महेश कोसूरकर सभासद शालिनीताई देविदासजी ईखार संतोष सुपारे, अंकुश ढवळे, सेवार्थ दवाखान्याचे विभागप्रमुख डॉ. संदीप लोंढे, वैद्यकीय अधिकारी डॉ, प्रतीक येणोरकर यांची उपस्थिती होती