बीड ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील रांजणी गावात आज शासन आदेशानुसार 75 वा आजादी महोत्सव साजरा करण्याकरीता हर घर तिरंगा मोहिम राबवण्या करीता रांजणी ग्रामपंचायत च्या वतीने तिरंगा ध्वज वाटप करण्यात आले तसेच ध्वज वाटप करून सर्व ग्रामस्थांना तिरंगा ध्वज कसा व केव्हा आपल्या घरावर फडकवायाचा व त्या ध्वजाची काळजी कशी घ्यावी या बाबतीत कॅप्टन भास्कर ससाणे यांनी सविस्तर माहीती दिली हा तिरंगा ध्वज वाटप करताना रांजणी ग्रामपंचायतचे सरपंच रामराव जाधव उपसरपंच बळीराम कदम व ग्रा . प . सदस्य मुनिर शेख . गणेश करांडे वसंत वाघमारे . रामदास हांके . व ग्रामपंचायत कर्मचारी तथा पत्रकार शेख याशीन आसाराम रोडगे . माजी सरपंच भारत करांडे . अंगद करांडे . या सर्वाच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या उत्साहात रांजणी / शिंदेवाडी ग्रामस्थांनी तिरंगा ध्वज घेतले व तिरंगा ध्वज वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं