शिरुर : "आयुष्यात नक्की काय बनायचे आहे हे शालेय जीवनातच ठरवले पाहिजे. दहावी, बारावीनंतर निवडलेली दिशा हि आयुष्याला कलाटणी देत असते. त्यामुळे दहावी, बारावीनंतर काय करायचे? हे ठरवून त्या क्षेत्राची परिपूर्ण माहिती घ्या. मनातील भीती, न्युनगंड दूर करून सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणे अवघड नाही." असे प्रतिपादन द युनिक अँकँडमी पुणे चे संचालक प्रा. तुकाराम जाधव यांनी केले. शिरूर येथील गंगा एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानगंगा विश्व विद्यालयातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ व करीअर मार्गदर्शन मेळावा  संपन्न झाला. या कार्यक्रमावेळी बारावीनंतर काय करावे? व स्पर्धा परीक्षांतील विविध संधी या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. तुकाराम जाधव बोलत होते. कर्नल महेश शेळके यांनी सैन्य दलातील विविध संधी या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.राजेराम घावटे,संचालक अमृतेश्वरी घावटे, ॲड.कुशल चव्हाण, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन घावटे, बी.डी.शिंदे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना जाधव म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्याकडे प्रचंड ताकद असते. सातत्यपूर्ण वाचन ,लिखाण केले तर मुलाखतीला सामोरे जाण्याची भीती वाटत नाही.एकदा करिअर ची दिशा निवडली तर यश मिळेपर्यंत माघार घ्यायची नाही असे ते म्हणाले. कर्नल महेश शेळके म्हणाले, "जगातील स्पर्धेत टिकायचे असेल तर स्वतःला सिद्ध करता आले पाहिजे. योग्य वयात तुमचा रस्ता तुम्ही स्वतः निवडा म्हणजे योग्य मार्ग सापडेल. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणे अवघड नाही, परंतु परीश्रम केल्याशिवाय यशाला दुसरा पर्याय नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उर्जा असते. आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जा. यश नक्की मिळेल." असे शेळके म्हणले.या वेळी मुख्याध्यापक संतोष येवले,सुनंदा लांघे,योगेश माने,चंद्रकांत शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी वैद्य यांनी केले. तर आभार रावसाहेब चक्रे यांनी मानले. चौकट - जागतिक पातळीवर ग्रामीण विद्यार्थी टिकला पाहिजे. या साठी योग्य शिक्षण मिळाले पाहिजे. प्रेरणादायी व्याख्याते यांचे माध्यमातून विद्यार्थाचे मनोबल उंचवते. प्रा.डॉ.राजेराम घावटे संस्थापक ज्ञानगंगा विश्व विद्यालय फोटो ओळ : बाबुराव नगर (ता.शिरूर) : स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन करताना प्रा. तुकाराम जाधव व उपस्थित विद्यार्थी

Sponsored

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट - बूंदी

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |