[ रत्नागिरी] 

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

जिल्ह्यात रिक्त पदांमुळे जि. प. च्या शाळांमधील शिक्षण अडचणीत सापडले आहे. त्यात आंतरजिल्हा बदलीमुळे रिक्त पदांच्या संख्याही वर्षागणिक शेकडोंच्या घरात जात आहे. सध्या २३०० पदे रिक्त असल्याचे दिसून येत आहे. शासनाने यावर गंभीरपणे विचार करत शिक्षक भरतीला हिरवा सिग्नल दिला आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जवळपास दीड हजार पदे भरणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.

आंतरजिल्हा बदल्या सध्या वादात सापडल्या आहेत. गतवर्षी ७१५, २०२१ मध्ये १८०, २०२२ मध्ये ३५० तसेच यावर्षी आता ३४६ शिक्षक आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्याबाहेर गेले आहेत. त्याचबरोबर मागील काही वर्षात प्राथमिक शिक्षकांची भरतीच झालेली नसल्यामुळे रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. कोरोना कालावधीमध्येही यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे बीएड, डीएड झालेल्या तरुणांमध्ये असंतोषाचे वातावरण तयार झाले होते. ही बाब राज्य सरकारने गांभिर्याने घेत भरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी पावले उचलली. गतवर्षी जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त पदांची माहिती संकलित करण्यात आली.

रोस्टर तपासून भरती प्रक्रिया राबविण्यासाठी प्रशासन सज्ज झाले होते. जे तरूण या भरतीसाठी पात्र आहेत, त्यांना पवित्रे पोर्टलवर लॉगीन करण्यासाठी सुचना देण्यात आल्या होत्या. त्याला कालावधीही दिला गेला होता. राज्यातील सर्वच जिल्हापरिषद प्रशासनाकडून ऑनलाईन भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जाहीरात प्रसिध्दीचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेसाठी ८ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ती पूर्ण झाल्यामुळे जाहिरात प्रसिध्द करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. पवित्र पोर्टलवर लॉगिन केलेल्या उमेदवारांना जागांची माहिती ऑनलाईन दिली जाणार आहे. ती पुढील चार दिवसात लॉगिनला टाकण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रत्नागिरी जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदल्यांच्या सहाव्या टप्प्यात तिनशेहून अधिक बदल्या झाल्या. त्यामुळे शिक्षकांची रिक्त पदे दोन हजारवरून तेवीशेवर पोचली आहेत. बदली पात्र शिक्षकांची पदे भरतीत समाविष्ट केली गेली आहेत. एकुण रिक्त पदांपैकी ७० टक्के पदे भरण्यास शासनाकडून परवानगी दिली गेली आहे. त्यानुसार सुमारे १ हजार ५५० पदांची जाहिरात काढली जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार ऑनलाईन कार्यवाही पूर्ण झालेली आहे.