[ संगमेश्वर ]

पंचक्रोशी शिक्षण मंडळ, कडवईच्या भाईशा घोसाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कडवई येथे विश्व हिंदी दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

विश्व हिंदी दिन २००६ पासून सर्व जगभर साजरा करण्यात येतो.यानिमित्ताने शाळेमध्ये चित्रवर्णन, कहानी लेखन व कविता पाठांतर स्पर्धा घेण्यात आल्या.चित्रवर्णन स्पर्धेत सानवी उजगावकर प्रथम, अर्णवी कानाल द्वितीय, अन्वया किंजळकर तृतीय,तेज साळवी चतुर्थ तर सिध्दी उजगावकर हिने पाचवा क्रमांक प्राप्त केला.कविता पाठांतर प्राथमिक गट स्पर्धेत अर्णवी कानाल प्रथम, वैदही चव्हाण द्वितीय,वेदिका कांबळे तृतीय,स्वानंद सुर्वे चतुर्थ तर क्षितिज सरमोकदम याने पाचवा क्रमांक पटकावला.कहानी लेखन स्पर्धेत मनश्री कडवईकर प्रथम,दिप्ती अवघडे द्वितीय,रिया कडवईकर तृतीय,आर्यन भडवळकर चतुर्थ तर तनिष्का साळुंखे हिने पाचवा क्रमांक प्राप्त केला.कविता पाठांतर माध्यमिक गट स्पर्धेत प्रथमेश कुंभार प्रथम,मनश्री कडवईकर द्वितीय ,संजोग बेंडके तृतीय,सृष्टी कुंभार चतुर्थ तर यश बेटकर याने पाचवा क्रमांक पटकावला.

               

प्रमुख अतिथी राजेंद्र खांबे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की भारतासारख्या विशाल देशात संपर्क भाषा म्हणून हिंदीचे स्थान अनन्यसाधारण आहे.हिंदी ही आदराची भाषा आहे.हिंदी साहित्याचा इतिहास उलगडून दाखवताना त्यांनी संत कबीर,प्रेमचंद,मोहन राकेश,महादेवी वर्मा यांच्या साहित्यातील काही प्रसंग कथन केले. सीमिन काझी यांनी विश्व भाषा या रूपात हिंदीचे महत्व समजावले.या कार्यक्रमाला मुख्याध्यापक शेषेराव अवघडे व पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आशिष सरमोकादम यांनी विश्व स्तरावर हिंदी कशी पसरली हे समजावले.

             

परीक्षक म्हणून निलेश कुंभार,प्रदीप कानाल,सौजन्या महाडिक,शशिकांत किंजळकर,सिध्दी सुर्वे,सूरज कदम,नयना राजेशिर्के व शुभम शिंदे यांनी काम पाहिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कडवईकर यांनी केले.यावेळी पर्यवेक्षक संतोष साळुंके व पालक शिक्षक संघाचे सदस्य संजय उजगावकर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय घोसाळकर,प्रशांत साळवी, अरविंद सुर्वे,राजेश खेडेकर व विजय धामणाक यांनी मेहनत घेतली.