[ रत्नागिरी ]
शहरातील आंबेडकरवाडी येथील रहिवासी व गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राध्यापिका प्रिती नाना जाधव यांना मुंबई विद्यापीठाने पीएचडी पदवी जाहीर केली आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
प्रिती जाधव यांनी नुकतीच मुंबई विद्यापीठाची भौतिकशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली. भौतिक शास्त्रात मुंबई विद्यापिठात संशोधनात्मक प्रबंध सादर केला. यामध्ये त्यांना पीएचडी पदवी जाहीर करण्यात आली आहे. त्यांना गोगटे कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, डॉ. महेश बेळेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या प्रबंधासाठी गोगटे कॉलेजच्या भौतिक शास्त्र विभागाच्या प्राध्यपकांची त्यांना सहकार्य लाभले आहे.
पीएच.डी पदवी प्राप्त झाल्याबद्दल प्राध्यापिका प्रिती जाधव यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे. भारतीय बौद्ध महासभा आणि भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी, (१० जानेवारी २०२४) त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही संघटनांच्या वतीने पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.