अमरावती :-  10 जानेवारी 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रातील ट्रक, बस, कार, व इतर चारचाकी वाहनांचे चाके रस्त्यावर धावणार नाही. हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ 10 जानेवारी 2024 पासून अमरावती जिल्हा वाहन चालक मालक कृती समिती ने संपूर्ण महाराष्ट्र बंद चे आव्हान केले आहे. 

अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समिती महाराष्ट्र राज्य तर्फे महाराष्ट्र बंद च्या आव्हान केल्याने संपूर्ण राज्यात बंद आहे. भारतीय जनता पक्षाने हिट अँड रन कायदा लागू करण्यात आला होता. हा कायदा मूलतः रद्द करण्यात यावा याकरिता, तर अमरावती जिल्हा वाहन कृती समिती ने आंदोलना द्वारे आपल्या मागण्या मांडल्या आहेत. त्या याप्रकारे 1) वाहन चालक ड्रायव्हर ला अपघातात मारहाण झाल्यास त्याच्यावर302 मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविल्या जाणार आहे. 2) ड्रायव्हर ला मारहाणीत शरीराचे कोणतेही भाग फॅक्चर झाल्यास ड्रायव्हरला शासनामार्फत अनुदान मिळावे, 3) ड्रायव्हरला मारहाणीत मार लागल्यास पूर्ण दवाखाण्याचा सर्व खर्च केंद्र, राज्य सरकारने व राज्य शासनाने दयावा आणि ड्रायव्हर बरा होईपर्यंत करावा 4) ड्रायव्हरला पोलीस प्रशासनाकडून विनाकारण कोणताही त्रास होऊ नये व ड्रायव्हर सोबत अन्याय होणार नाही याची प्रशासनाने नोंद घ्यावी. 5) चालक ड्रायव्हर चा अपघातात मृत्यू झाल्यास ड्रायव्हर चालक च्या मुलाबाळांनचे संपूर्ण शिक्षण होईपर्यंत शासनाने अनुदान द्यावे. व त्याच्या पूर्ण खर्च शासनामार्फत करण्यात यावा व मुलाचे पूर्ण शिक्षण होईपर्यंत पालन पोषणाची जवाबदारी खर्चासह राज्य सरकारने व राज्य शासनाने करावी अश्या अनेक मागण्या पूर्ण मान्य होत नाही. किंवा हिट अँड रन कायदा पुर्णतःरद्द होत नाही तो पर्यंत अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात बंद ठेवण्यात आला आहे.