बकोरी तालुका हवेली येथील वारघडे परीवाराने बकोरी देवराई वनराई प्रकल्पात निसर्गाच्या सानिध्यात  प्राणवायू देणाऱ्या झाडांना राखी बांधून  रक्षाबंधन  साजरे केले.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

बकोरी देवराई वनराई प्रकल्पात माहिती सेवा समिती, दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान यांचे माध्यमातून गेले ५ वर्षापासून वृक्षारोपण करण्यात येत आहे आज अखेर ३०००० देशी ८५ प्रजातींची झाडे लावली आहेत.दरवर्षी चंद्रकांत वारघडे यांच्या परीवारातील सदस्य झाडांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करत असतात याही वर्षी तशाच प्रकारे झाडांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला व त्याठिकाणी काम करणारे कामगार यांनाही राखी बांधून त्यांना शुभेच्छा दिल्या.

   तसेच वारघडे यांचा कुत्रा वृक्ष मित्र" मोती "याला देखील दरवर्षी घरी  राखी बांधली जात होती परंतु यावर्षी मोतीचे निधन झाल्यामुळे ज्याठिकाणी मोतीचे दफन केले आहे त्याठिकाणी पाच झाडे लावली आहेत त्या झाडांना मोतीच्या नावाने राखी बांधली.

    यावेळी चंद्रकांत वारघडे , धनराज वारघडे यांनी बहिणीना रक्षाबंधनाच्या निमित्ताने झाडे देत रक्षाबंधन सण साजरा केला ,

   यावेळी चंद्रकांत वारघडे यांच्यासह मुलगा धनराज, मुलगी धनश्री, पत्नी माया, बहीण रंजना शिवतारे या सर्वांनी झाडांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.