आताच पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत नोव्हेंबर 2005 पुर्वी जाहिरातीने नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना सरकारने जुनी पेन्शन योजना हा पर्याय दिला आहे.पण ही योजना सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा। कालच्या निर्णयाचा लाभ केवळ ५ ते ६ हजार कर्मचाऱ्यांना च होईल, की ज्यांची नोकरीची जाहिरात १ नोव्हेंबर २००५ पूर्वीची होती.. अश्या १% पेक्षा ही कमी असलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन दिल्याचा गाजावाजा होत आहे, मात्र दुसरीकडे ९९% पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना ताटकळत ठेवणे , त्यांच्यासोबत भेदभाव करण्यासारखे आहे.. सरकारने कोणताही भेदभाव न करता सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना जशी आहे तशीच लागू करावी, अन्यथा नेत्यांनी Vote For OPS साठी तयार रहावे असे आव्हाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटने तर्फे करण्यात आले आहे