*छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल मध्ये क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी...* 

*जालना जिल्हा मुख्य प्रभारी रविंद्र भदर्गे*

सावित्रीमांईंच्या जयंतीनिमित्त तहसीलदार डॉ.प्रतिभा गोरे यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यां विषयी शिक्षकांशी चर्चा केली. चर्चा करत असताना त्या म्हणाल्या शिक्षकच असा व्यक्ती आहे जो मुलांमधील अज्ञान दूर करू शकतो. विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी रुजवून नैतिक मुलांची जोपासना करू शकतो. मुलांमध्ये जो मोबाईल वापराचा अतिरेक होतोय तो थांबवू शकतो. तसेच आई-वडिलांपेक्षाही मुलांचा शिक्षकांवर जास्त विश्वास असतो. असे त्यांनी प्रतिपादन केले.

    या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. शाळेतील अनेक विद्यार्थिनीनी सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान करून तसेच त्यांच्या जीवनाविषयी माहिती सांगून सावित्रीबाई फुले यांचा जीवन पैलूंचा परिचय करून दिला.

कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या महिला पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती सपना वाघ यांनी महिला सशक्तिकरण यावर आपले भाष्य केले. तसेच आजच्या युगातील महिला व स्त्री- पुरुष समानता तसेच विद्यार्थ्यांनी जास्त मोबाईलचा वापर करू नये असेही प्रतिपादन केले. तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या मोहिनी जवळेकर यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

उपाधीक्षक भूअभिलेख कार्यालय परतूर येथील भूमापक मंगल गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की सावित्रीबाईंनी सांगितल्यानुसार समाजातील अज्ञान हा आपला खरा शत्रू आहे त्याला आपल्या जीवनातून काढल्याशिवाय मानवाची प्रगती नाही हे खरे आहे त्याच्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत राहूयात.

शाळेच्या मुख्याध्यापिका लंका भवर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन संघर्षावर आधारित स्वरचित एक ओवी सादर केली.

शाळेचे अध्यक्ष अभयकुमार काळुंके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की आजच्या शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील आदर्श मूल्यांचा अंगीकार केला पाहिजे. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

   या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजनाचे मार्गदर्शन शाळेच्या सचिव मीनाक्षी काळुंके यांनी केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता खालापूरे यांनी केले तर आभार प्रदर्शन पौर्णिमा गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरुषोत्तम मगर, शेषनारायण बिल्लारे, सुरज पहाडे, शितल मुंडे, साधना पाईकराव, श्रीमती महाजन, सुनंदा व्यवहारे, श्रीमती हिवाळे यांनी अथक परिश्रम घेतले.