शिरुर -वृक्षारोपना बरोबरच वृक्षसंवर्धन महत्वाचे असल्याचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे पुण्याचे विभागीय संचालक डॉ . व्ही. बी .गायकवाड गुनाट , ता शिरुर येथे उद्घघाटन प्रसंगी म्हणाले . सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे सातदिवसीय विशेष हिवाळी शिबीराचे गुनाट ता .शिरुर उदघाटन झाले . यावेळी शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा , सचिव माजी प्राचार्य नंदकुमार निकम , यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठचे पुणे विभागीय संचालक डॉ . व्ही . बी. गायकवाड , राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमधिकारी डॉ .प्रा . एस . पी कांबळे , प्रा . डॉ . रेणूका गायकवड ,डॉ . अशोक काकडे , प्रा .डॉ .अंबादास केत ,प्रा. दीपक टोणगे ,मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्रचे मार्गदर्शक प्रा . चंद्रकांत धापटे ,सरपंच सुनंदा शिवाजी कोळपे , उपसरपंच नम्रता धुमाळ , ग्रामसेवक व्ही. बी कर्पे उपसभापती सतीश भागूजी कोळपे , रोहीणी गव्हाणे , माजी उपसरपंच अनिल भालेराव , ग्रामपंचायत सदसय रामदास काकडे , तेजस भगत , सुनीता भगत , तंटामुक्त अध्यक्ष बापूसाहेब झिटे , भाजपाचे सरचिटणीस माउली बहिरट , गणेश महाराज डोंगरे , संभाजी गाडे , भाउसाहेब फंड , राजाराम वळू , मुख्याध्यापिका सुषमा शितोळे , प्रा .डॉ . अजित चंदनशिवे , केंद्र सहाय्यक निळोबा भोगावडे , आदी यावेळी उपस्थित होते . यावेळी डॉ .व्ही . बी गायकवाड म्हणाले की महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षी राष्ट्रीय सेवा योजना सुरु झाली . सुरुवातीला ४० हजार विद्यार्थी या योजनेत सहभागी होते . आज अखेर पर्यत ७ .२ कोटी हून आधिक विद्यार्थी राष्ट्रीय सेवे योजनेत सहभागी झाले आहेत .राष्ट्रीय सेवा योजनेमुळे व्यक्तिमत्व विकास होतो , धाडस वाढते व अनुभवजन्य शिक्षण मिळते . वृक्षरोपना बरोबरच वृक्ष संवर्धन ही महत्वाचे आहे . शिबीर काळात गुनाटचे आर्थिक व अन्य बाबींचे सर्वेक्षण करावे अशी सूचना त्यांनी केली . 

सचिव नंदकुमार निकम म्हणाले की स्वंत: ची ओळख व स्वंशिस्त या शिबीराच्या माध्यमातुन विद्यार्थ्याना मिळते . या स्पर्धात्मक युगात आपल्या कल्पना कश्या मांडायच्या , नेतृत्व कसे करायचे हे स्वंयसेवकांना शिकायला मिळते . टिकावू व शाश्वत विकासाची कामे ही स्वयंसेवका मार्फत उभारण्यात यावीत  अशी सुचना त्यांनी केली .

कार्यक्रमाचे अध्यक्ष  अनिल बोरा म्हणाले की या शिबीरातून विविध प्रकारचे अनुभव विद्यार्थ्याना  मिळणार  आहेत .स्वयं शिक्षण च्या  दृष्टीने ही शिबीरे महत्वाची आहे .  गुनाट परिसरातील शिक्षणासंदर्भात  संस्थेचा वतीने मार्गदर्शन करण्यात येईल . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ . के. सी .मोहिते म्हणाले की शिबीराच्या माध्यमातुन विविध गोष्टी शिकायला मिळते . शहरातील लोक विविध समस्यामुळे आता राहण्यासाठी खेड्याकडे वळत आहे स्वयंशिस्त या शिबीरातून विद्यार्थ्यांच्या अंगी रुजते असे सांगून महाविद्यालयाचा विविध उपक्रमांची माहिती दिली . यावेळी स्वागत डॉ. प्रा.एस .पी कांबळे यांनी केले . सूत्रसंचालन प्रा .डॉ .क्रांती पैठणकर ( गोसावी ) यांनी केले . आभार  प्रा डॉ . रेणूका गायकवाड यांनी मानले .