अमरावती प्रतिनिधी :- 

           अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातून अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळगाव मंगरूळ येथे पहिल्या रेती डेपो चे आमदार प्रताप अडसड यांच्या पुढाकाराने , तर शासकीय यंत्रणे च्या साहाय्याने सुरु झाला. एस.डी.ओ. रविंद्र जोगी, खनिज अधिकारी इमरान शेख, आमदार प्रताप अडसड, तहसीलदार गोविंद वाकडे, जळगांव मंगरूळ ग्रामपंचायत चे सरपंच मनोज शिवणकर, मनोज डहाके यांनी यावेळी हिरवी झेंडी दाखवून रेती डेपोला सुरुवात केली असून या माध्यमातून घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती मोफत दिली जाणार आहे. तर सामान्य व्यक्तीला 600 रुपये ब्रास याप्रमाणे रेती मिळणार आहे. 

   बांधकाम करणाऱ्या स्वतःच घर बांधणार आहेत किंवा शासकीय काम असेल त्यांना 600 रुपये ब्रास याप्रमाणे हि रेती उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आमदार प्रताप अडसड यांनी आभार मानले. सर्वसामान्य नागरिकांची कंबर मोडणारा रेतीचा हा मुख्य विषय होता. सर्वसामान्य व्यक्तीला न परवडणारा होता. 10 ते 15 हजार रुपये पर्यंत एक ब्रास रेती आता सामान्य नागरिकाला कमी पैशात गरजूंना उपलब्ध होईल.आणि रेती मध्ये होणारी काळाबाजारी थांबेल. सामान्य माणसाच्या खिशातून नेमके अधिक जाणारे पैसे जात होते ते मात्र आता थांबेल असे प्रसार माध्यमांशी बोलतांना चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रताप अडसड यांनी म्हटले आहे.या संदर्भात सर्वसामान्य जनतेला या माध्यमातून आव्हान करत सांगितले की या योजनेचा लाभ घ्यावा.ज्यांना याची माहिती नाही त्यांना याची माहिती द्यावी असे आव्हान अडसड यांनी केले .

     तसेच या जळगाव मंगरूळ रेती डेपोमध्ये 1000 हजार ब्रास रेती ची साठवणूक केली आहे. तर 26 हजार ब्रास पर्यंत डेपो मध्ये रेतीची साठवल्या जाणार आहे.रेती खरेदी साठी लाभार्थ्यांना महा खनिज यापोर्टल साईडवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.