भाटवडगावात विक्रेत्याच्या घरावर धाड; साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : शहर पोलिस ठाणे हद्दीत असणाऱ्या भाटवडगाव येथे बुधवारी पोलिसांनी गुटखा विक्रेत्याच्या घरावर धाड टाकली. कारवाईदरम्यान घरातून गुटख्यासह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी सख्ख्या मामाने गुटख्याची राखण करण्यासाठी अल्पवयीन भाच्याला ठेवल्याचे आढळून आले.

शहर ठाणे पोलिसांना बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास खबऱ्यामार्फत नवीन भाटवडगाव येथे घरातून गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी गुटखा विक्रेत्याच्या घरावर धाड टाकली असता घरामध्ये ४ लाख ४९ हजार ४० रुपयांचा गुटखा

आढळून आला.

पोलिसांनी घरात असलेल्या १७ वर्षीय मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता मामा सुरेश साधू धुमाळ गेल्या सहा महिन्यांपासून घरात गुटख्याची साठवणूक करतो. त्यानंतर कारमधून शहरात गुटखा विकतो. ही माहिती कोणाला सांगितली, तर तुझे शिक्षण बंद करून टाकील, अशी धमकी मामाने दिल्याने मुलाने सांगितले.

या प्रकरणी सुरेश धुमाळ याच्याविरोधात माजलगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक नीलेश इधाते, पोलिस उपनिरीक्षक गजानन सोनटक्के ि यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पार पाडली.