समुद्रपुर तालुक्यातिल गिरड येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही वैराग्य मुर्ती संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या थाटात साजरी करण्यात येते २३ डिसेंबर पासून २८ डिसेंबरपर्यंत याठिकाणी मोठ्या भक्तीमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले २८ डिसेंबरला सकाळी गाडगेबाबा मंदिरातून भव्य दिंडी शोभायात्रे आयोजन करण्यात आले होते यावेळी परीसरातील भजन मंडळींनी मोठ्या संख्येने सहभागी होत गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला गजर केला या दिंडी शोभायात्रेने संपूर्ण गावाचे मार्गक्रमण करीत दिंडीचा समोरोप मंदिरात करण्यात आली यावेळी गावात ठिकठिकाणी या दिंडीचे स्वागत करण्यात आले.त्यांनतर दुपारी गोपाल काल्या करण्यात आला.७ दिवस चाललेल्या या पुण्यतिथी महोत्सवात प्रवक्ता परमपूज्य गुरुवर्य बांगरे महाराज यांचे प्रबोधनांसह दररोज सकाळी ५ वाजता काकड आरति, ७ वाजता  पारायण,सायंकाळी ६ वाजता हरीपाट व भारुड होनार आहैया शिवाय रोज समाज प्रबोधनाचे विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ४ वाजता भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला महोत्सवात संपूर्ण गिरड नगरी धार्मिक वातावरणाने दुमदुमून गेली होती.या महोत्सव मोठ्या संख्येने परीसरातील भाविक भक्त सहभागी झाले होते या संपूर्ण महोत्सवाला येशस्वी करण्यासाठी संत गाडगेबाबा देवस्थान कमिटी व गिरड गावातील सर्व नागरिकांनी सहकार्य केले.