मुरमा ग्रामपंचायतचा सरपंचाचा पदभार उपसरपंचाकडे,

"महिला सरपंच अपात्र झाल्याने गावची धुरा महिला उपसरपंच सांभाळणारं"

पाचोड (विजय चिडे)‌ महीला सरपंचाच्या पतीने शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्या प्रकरणी मुरमा ता.पैठण येथील महीला सरपंचाचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय सदस्यत्व रद्द केले असल्याने मुरमा येथील सरपंच पद हे मागील वीस दिवसांपासून रिक्त होते.त्यामुळे गावांच्या विकासाला खीळ बसली होती. त्याकरीता उपसरपंच उषा दिनकर मापारी यांच्याकडे गटविकास अधिकाऱ्यांनी पदभार दिला असल्याने आता गावची धुरा ही उपसरपंचाकडे दिली गेली आहे‌. मुरमा येथील सिंधुबाई शिंदे यांचे पती दादासाहेब शिंदे यांनी गावातील शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्यामध्ये पक्कं घर बाधून राहत असल्याची तक्रार मुरमा ग्रामपंचायत सदस्य गोपीचंद आहेर यांनी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. ग्रामपंचायत च्या सरपंच सिंधूबाई दादासाहेब शिंदे यांच्या पतीने गावातील महाराष्ट्र शासनाच्या जागेवर ५० बाय५० मध्ये अतिक्रमण करून त्यामध्ये राहत आहे. सरपंच व त्यांच्या पतीने शासकीय जमिनीवर मागील काही वर्षांपूर्वी अतिक्रमण करून त्यात आवारभिंत, पक्कं बांधकाम, घरबांध कामसुद्धा केले आहे. त्यामुळे शासकीय जागेवर अतिक्रमण करणे म्हणजे ग्रामपंचायत अधिनियमाची पायमल्ली असल्याचा आरोप गोपीचंद आहेर यांच्याकडून जिल्हाधिकारया कडे केल्या तक्रारीत करण्यात आला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून सिंधुबाई शिंदे यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले असल्याने गावाचं सरपंच रिक्त झालेल्या आता गटविकास अधिकाऱ्यांनी उपसरपंच उषा मापारी यांच्याकडे गावचा पदभार दिला आहे.