हिंगणघाट- आज विवाह समारंभ थाटात साजरा करण्याचे फॅड वाढत असून विवाहाच्या माध्यमातून शो दाखविण्याकडे कल असताना हिंगणघाट येथे पार पडलेले लग्न मात्र चर्चेचा विषय ठरत आहे.शेतकरी संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष व वेगळ्या विदर्भ राज्याचे पुरस्कर्ते राजेंद्र झोटिंग यांच्या मुलीचं लग्न चंद्रपूर येथील कौस्तुभ चौधरी यांचे सोबत जुळले.
साक्षगंध साध्या पद्धतीने करीत लग्नाच्या पत्रिकेत वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करण्यात आली. सोबतच सामाजिक संदेश देत शासकीय योजनांची माहिती लोकांना पत्रिकेच्या माध्यमातून देण्यात आली.
विवाह समारंभात वेळखाऊ नव्या प्रथांना बाजूला सारत अगदी मुहूर्तावर विवाह समारंभ आटोपला.वर वधूच्या हस्ते वृक्षारोपण करून सुलग्नाला सुरुवात करण्यात आली.नवरदेव घोड्यावर न येता वरात छकडया वर