शिरुर  - पुणे जिल्हा परिषद, पुणे व पंचायत समिती शिरूर यांच्या वतीने श्री . पांडूरंग विद्या मंदिर ,विठठलवाडी  येथे  तालुकास्तरीय  विज्ञान व गणित प्रदर्शन चे आयोजन  करण्यात आले होते .        या प्रदर्शनात आयेशा बेगम उर्दू हायस्कूल शिरूर जिल्हा पुणे चे उपशिक्षक महंमद सिराजोद्दिन बुन्हाणोद्दीन यांच्या 'Experiment of Trigonometry' ह्या प्रकल्पाला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला व जिल्हा विज्ञान व गणित प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. तसेच प्रयोगशाळा परिचर खान इम्रान अमीर यांचा प्रयोगशाळा परिचर या गटामध्ये 'Multipurpose Solar Vaccum Cleaner' ह्या प्रकल्पाला (प्रयोगाला) तालुका विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाला. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी रमेश चव्हाण यांच्या हस्ते शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) सुनंदा गायकवाड , शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प.पुणे) संध्या गायकवाड गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांच्या उपस्थितीत बुन्हाणोद्दीन व  खान यांचा सत्कार  करण्यात आला.

   संस्थेचे अध्यक्ष हाजी इब्राहीम गुलामनबी शेख (भाईजान), उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष नसीमखान अजिमोद्दिन खान , सचिव महंमद हुसेन पटेल शाळेचे मुख्याध्यापक सांगलीकर फारुक अहमद यांनी  बुन्हाणोद्दीन व खान यांचे  अभिनंदन केले आहे .