शिरूर – मागील नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या सरकारने केलेल्या विविध कामांचा मुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ३५० हून अधिक जागा जिंकू असा विश्वास केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी व्यक्त केला आहे. विकसित भारत संकल्प यात्रेचा निमित्ताने चौधरी हे शिरूर तालुक्यात आले असता बातमीदारान समवेत बोलत होते. यावेळी शिरूर भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे,भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पूनम चौधरी, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक विनोद भालेराव, शिरूर आंबेगाव भाजपाचे तालुकाध्यक्ष मारुती शेळके, माजी तालुकाध्यक्ष सतीश पाचंगे, माजी पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, भाजपाचे विजय नरके, नीलेश नवले, राजेंद्र महाजन  , अनघा पाठक आदी उपस्थित होते.

      महाराष्ट्रात आमचे मित्र पक्षांनसमवेत सरकार असून आगामी निवडणुका एकत्रित लढून महाराष्ट्रातही चांगली कामगिरी करू असे ही ते म्हणाले. चौधरी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०४७ पर्यत भारताला विकसित राष्ट्र करण्याचा संकल्प केला आहे. समाजातील शेवटच्या घटका पर्यत व विविध योजनांना पात्र असणा-या व्यक्ती पर्यत शासनाची घरांची योजना ,शौचालय योजना, गॅस योजना, वीजेची योजना, किसान सन्मान योजना, स्वनिधी योजना या सारख्या विविध योजना पोहचाव्यात आणि योजनाचा लाभ व्हावा या करीता विकसित भारत संकल्प भारत यात्रा विविध भागातून जात आहे. ‘सबका साथ ,सबका विकास’, हा विचार घेवून कोणत्याही भेदभाव न करता योजनेसाठी जी पात्र व्यक्ती आहे. त्याच्या पर्यत योजना शासन पोहचवीत आहे. विकसित भारताचा निर्माण साठी सर्व क्षेत्रांना मजबूत करण्याचे काम शासन करीत आहे. तीन राज्याचा विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमताने लोकांनी निवडून दिले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ३५० हून अधिक जागा जिंकू असा विश्वास ही चौधरी यांनी व्यक्त केला.