बीड प्रतिनिधी / दि.11चंपावती माध्यमिक विद्यालयातील माध्यमिक सहशिक्षक जावळे सुनील विक्रम यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती डिसेंबर 2021 मध्ये घेतली आहे समायोजनापूर्वीची शाळा जानपिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नाळवंडी कारेगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड यांनी सेवा पुस्तकातील नोंदी साक्षांकित न करताच सेवा पुस्तिक समायोजित शाळेकडे दाखल करून पेन्शन मंजूर प्रकरणी माझी विनाकारण अडवणूक करून माझे पेन्शन प्रकरण रोखून धरले आहे. त्यामुळे गेली सात महिन्यापासून पेन्शन अभावी माझा व माझ्या कुटुंबीयांचा आर्थिक व मानसिक छळ करून उपासमार केली जात आहे .मुलांचे शिक्षण, कुटुंबीयांचे आजारपण व दैनंदिन गुजराण करणे मला पेन्शनअभावी अवघड झाले आहे. मला दुसरे आर्थिक उत्पन्नाचे साधन नाही .मी भूमिहीन आह.अनुसूचित जाती पैकी एस सी प्रवर्गामधील असून माझी आर्थिक अडवणूक व छळवणूक केली जात आहे .याबाबत सातत्याने तोंडी व लेखी पत्रव्यवहार करूनही माझा प्रश्न निकाली न काढल्यामुळे व माझी आर्थिक छळवणूक व अडवणूक केल्यामुळे मी दि.15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी दिनी आत्मदहन करण्याचा इशारा मा, शिक्षणाधिकारी साहेब माध्यमिक जिल्हा परिषद बीड यांना दिला आहे.
आत्मदहनानंतर माझ्या जीविताचे काही बरे वाईट झाल्यास म्हणजेच मला मरण आल्यास माझे मरणोत्तर मी केलेल्या आत्मदहनास प्रवृत केल्याच्या कारणाने याची सर्वस्वी जबाबदारी माननीय शिक्षणाधिकारी साहेब माध्यमिक जिल्हा परिषद बीड .तसेच माननीय मुख्याध्यापक साहेब जानपीर विद्यालय नाळवंडी कारेगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड .श्रीमती फुंदाबी पठाण शिक्षण प्रसारक मंडळ नाळवंडी तालुका पाटोदा जिल्हा बीड येथील अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी साहेबांनी गठीत केलेल्या त्री सदस्य चौकशी समितीचे अध्यक्ष, सचिव व सदस्य यांना माझे मरणोत्तर दोषी धरण्यात यावे. व त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करून मला व माझ्या कुटुंबीयांना माझे मरणोत्तर तरी न्याय द्यावा असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभाग माध्यमिक यांना केल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सेवानिवृत्त सहशिक्षक सुनील जावळे म्हटले आहे.