शिरुर - आपले विचार आपले जग घडवित असतात असे सांगून चांगले सकारात्मक विचाराचा अंगीकार जीवनात करावा असे आवाहन विश्व प्रसिद्ध आध्यात्मिक सकारात्मक मोटीवेशनल स्पीकर ब्रह्माकुमारी शिवानी दिदी यांनी केले . प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्व विद्यालय शिरुर व उद्योजक प्रकाशभाउ रसिकलाल धारीवाल परीवार यांचा वतीने शहरातील शिरुर बसस्थानका मागील रयत शाळेचा मैदानावर ' जिंदगी बने आसान ' या विषयावर शिवानी दीदी यांचे व्याख्यान झाले . ब्रम्हाकुमारी शिवानी दिदी या यु ट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, आस्था, संस्कार, पीस ऑफ माईंड, व अन्य टीव्ही चॅनेल वरुन विविध विषयांवर मार्गदर्शन करत असतात . राष्ट्रपतीच्या हस्ते नारीशक्ती पुरस्कार देवूनही त्यांना सन्मानित करण्यात आले होते पहाटे पासुनच रयत शाळेचा मैदानावर त्याचे व्याख्यान ऐकण्यासठी गर्दी झाली होती . कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले . यावेळी आमदार ॲड .अशोक पवार , कल्पना लुणावत, उज्जवला लुंकड , प्रांजल , माजी आमदार सूर्यकांत पलांडे , पोपटराव गावडे , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद , शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम , बारामतीचे मुख्याधिकारी महेश रोकडे , शिरुरच्या मुख्याधिकारी स्मिता काळे , पोलीस निरीक्षक संजय जगताप ,उद्योजक प्रकाश कुतवळ , प्राचार्य डॉं . प्रसन्नकुमार देशमुख , डॉ . के .सी. मोहिते फियाट कंपनीचे राकेश बावेजा आदी उपस्थित होते . यावेळी शिवानी दीदी म्हणाल्या की शहराला घराला ,शरीराला, स्वच्छ ठेवण्यासठी मन स्वच्छ असले पाहिजे . आपले विचार वातावरणावर व पर्यावरणावर परिणाम करते .आपले विचार आपले जग घडविते . सध्या नात्यात अडचणी वाढत आहे पर्यावरणात बदल होत आहे. आपले मन आपल्या नियंत्रणात असले पाहिजे जिंदगी साधी सोपी सरळ असताना तीला अवघड कोणी बनविले असा प्रश्न त्यांनी करुन जीवन आनंदी कसे जगावे याबाबतचे मार्गदर्शन केले .आपले मन एकाग्र न राहिल्यास त्याचा परिणाम आपल्या वागण्या बोलण्यावर होतो . मनावर स्वराज्य निर्माण करा .आपल्या विचारासाठी इतर दुसराना जबाबदार धरु नका . संभाषण करताना शब्दात सन्मान असला पाहीजे . संभाषण शांत व मृदुपणे करावे . आपण बदलण्यापेक्षा इतरानी बदलावे अशी अपेक्षा ठेवली जाते . आपल्या स्वंत:हात बदल केला पाहीजे .आपल्या विचाराचे जगण्याचे रिमोट इतराच्या हाती देवू नका . जो मनाने दु :खी आहे त्याला पाहून दु :खी होवू नका ,त्याला सुखाची शक्ती द्या . आपल्या विचाराचा परिणाम शरीरावर होतो .दुसराच्या व्यवहाराचा परिणाम स्वंत : च्या शरीरावर करु घेवू नका .चिंता ,भीति ताण तणाव याचा परिणाम शरीर स्वास्थावर होत असतो. मन चांगले राहिले तर शरीर चांगले राहील व आजारापासून दूर राहाल . समोरच्याचा व्यवहार कसाही राहु द्या तुम्ही सकारात्मक विचार सोडू नका . मुलाना शिस्त लावण्यासाठी त्यांच्यावर ओरडू नका त्याना विश्वासात घ्या व बदल घडवा . माझी शक्ती कुटुंबातील सर्वांची शक्ती वाढविणारी असली पाहीजे . जीवनात चमत्कार इतरानी करावा अशी अपेक्षा असते . परंतु तुमच्या जीवनात तुम्हीच चमत्कार करु शकता . जीवनातील परीक्षेला धाडसाने निर्भयपणे सामोरे जाण्यासाठी मनाला शक्तिशाली बनवा असे ही त्या म्हणाल्या . यावेळी प्रास्ताविक शिरुर केंद्राचा अर्चना बहेनजी यांनी केले तर सूत्रसंचालन शंकुतलाबहेजनी व संजय बारवकर यांनी केले .