सोलापूर - काय ते शहाजी बापू पाटील काय त्यांच्या तोंडात मावा, बाजूला बसल्यावर समदं वास मारतंय, अशा भाषेत शरद कोळी यांनी टीकास्त्र सोडलं आहे. उद्धव ठाकरे यांची साथ देणाऱ्या शरद कोळी यांनी गाव तिथे शिवसेनेची शाखा उघडण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत असताना बंडखोरी करून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्यात सत्तांतर केले. शिवसेनेत आऊटगोइंग सुरु झाले होते, मात्र आता इनकमिंगही सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी नेते व धाडस या सामाजिक संघटनेतून प्रसिद्ध झालेल्या शरद कोळी यांनी रविवारी मुंबई येथे जाऊन शिवबंधन बांधले आणि जिल्ह्यात कामाला लागा, असा आदेश दिला.

सोलापूर जिल्ह्यात एकेकाळी चार आमदार हे फक्त शिवसेनेचे होते. सद्यस्थितीत मात्र 11 विधानसभा मतदारसंघांपैकी सांगोला येथील फक्त एकाच मतदारसंघातून शहाजी बापू पाटील हे शिवसेना आमदार म्हणून निवडून आले आहेत. सोलापूर जिल्ह्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बळ देणार असून आगामी विधानसभा निवडणुकीत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकित शिवसेना बळकट करणार असल्याची माहिती शरद कोळी यांनी दिली. गाव तिथे शिवसेनेची शाखा उघडणार, खेड्यापाड्यात शिवसेना मजबूत करणार, असा निर्धार शरद कोळी यांनी केला आहे.