चाळीस वर्षीय शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या,
"पैठण तालुक्यातील हर्षी येथील घटना"
पाचोड विजय चिडे/ कर्जबाजारीपणाला कंटाळून एका ४० वर्षीय शेतकऱ्यांनी शेतवस्तीवरील राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हर्षी ता.पैठण येथे रविवारी (दि.२६)रोजी सांयकाळी सात वाजेच्या दरम्यान उघडकीस आली असून महिंद्रा आत्मराम वाघ (वय ४०)रा.हर्षी ता.पैठण,असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच नावं आहे.
याविषयी सूत्रांकडुन भेटलेल्या माहीतीनुसार,हर्षी ता.पैठण येथील महिंद्रा वाघ हे अल्पभूधारक शेतकरी आहे,यंदा दुष्काळामूळे शेतातील पिके वाया गेली आहे तर रब्बीची पेरणीच झालेली नाही.खरीपाच्या पेरणी साठी त्यांनी विविध बँकेकडून त्याचबरोबर खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. मात्र दुष्काळ पडला असल्यामुळे शेतात काही उगल नाही तर घेतलेल्या पिकाला बाजारपेठेत भाव नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. खत बियाणावरती लाखो रुपये खर्च करून हातात एक रुपया आला नाही. काढलेले कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत हे महिंद्रा वाघ हे अनेक दिवसापासून होते,अशा परिस्थितीमध्ये संसाराचा गाडा चालवणे मोठे मुश्किल झाले होते.रविवारी सकाळपासूनच महिंद्रा वाघ हे तणाव होते अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.ते आपल्या कुटुंबासोबत गेल्या वीस वर्षांपासून शेतवस्तीवर राहत होते.रविवारी पाचोड येथील बाजार असल्या कारणाने सर्वजण बाहेर गेले होते.यावेळी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचे नातेवाईक घरी गेले यावेळी घराचे दार बंद दिसले असता त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिलं यावेळी त्यांना महिंद्रा वाघ याने गळफास घेतल्याचे दिसून आले असता त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती गावातील नागरिकांना कळविले असता गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन महिंद्रा यास ताबडतोब फासावरून खाली उतरून तात्काळ खाजगी गाडीने पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ नोमान शेख यांनी त्यास तपासुन मृत्यू घोषीत केले तर पाचोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळी,फेरोज बर्डे यांनी घटनास्थळी भेट दिली असुन या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यामध्ये आकाम्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार आण्णासाहेब गव्हाणे, पवन चव्हाण हे करीत आहेत.