शिरुर -  हुतात्मा वीर जवान अभिवादन समिती शिरुर यांच्या वतीने शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते ,विविध सामाजिक संघटना एकत्रितपणे २६/ ११ च्या मुंबई वरील दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या वीरांना व नागरिकांना रविवार दि २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता  हुतात्मा स्मारक येथे  अभिवादन करण्यात येणार आहे .नागरिकानी अभिवादनास उपस्थित रहावे असे आवाहन हुतात्मा वीर जवान अभिवादन समिती शिरुर चा वतीने करण्यात आले आहे .