शिरुर - गेल्या अनेक महिन्या पासून रिक्त असणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षपदी ॲड. आदित्य दिलिप मैड यांची निवड करण्यात आली आहे . मनसेचे शहराध्यक्षपदी गेल्या काही महिन्यापासून रिक्त होते .या पदासाठी इच्छुकांची संख्या ही मोठी असल्याने या पदाची जबाबदारी कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता होती . ॲड. आदित्य मैड हे गेल्या १७ वर्षे पासून पक्षांमध्ये कार्यरत आहे. यापूर्वी त्यानी मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष , सचिव, विधी विभागचे तालुकाध्यक्ष म्हणून काम केले आहे .तसेच सामजिक कार्यात ही त्याच्या सहभाग आहे . . पुणे मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी मैड यांना निवडीचे पत्र पक्षाचे नेते राजेंद्र (बाबू) वागसकर, सरचिटणीस अजय शिंदे, जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर, जिल्हाउपाध्यक्ष महिबुब सय्यद, यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी मनसे वाहतूक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल खेडकर, माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे, जनहित चेशहराध्यक्ष रवी लेंडे उपस्थित होते. निवडीनंतर मैड म्हणाले की पक्षातील सर्वाना बरोबर घेवून पक्ष संघटन मजबूत करण्या बरोबरच पक्षाची ध्येय धोरण लोकापर्यत पोहचविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे .