शिरुर - येथील प्रजापिता ईश्वरीय विश्व विद्यालय येथे कृषक समाजाचे जिल्हाध्यक्ष व अविष्कार फाउंडैशन चे जिल्हा सचिव व बोरा महाविद्यालयातील सेवानिवृत्त अध्यापक प्रा. विलास आंबेकर यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विशेष सन्मान  करण्यात आला .                 यावेळी शिरुर कॉग्रेस आयचे शहराध्यक्ष ॲड .किरण आंबेकर, एलआयसी शिरुर शाखेचे वरिष्ठ आधिकारी कपिल मालवी ,शिरुर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक नितीन बारवकर ,जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर ,आम्ही शिरुरकर फाउंडैशनचे रवींद्र सानप , एलआयसीचे विकास आधिकारी पडवळ ,  कल्पना बरमेचा , सरपंच विलास कर्डिले , शिरुर नगरपरिषदेचे सेवानिवृत्त वरिष्ठा आधिकारी सुनील करळे ,बोरा महाविद्यालयातील सेवानिवृत्त वरिष्ठ आधिकारी किसन नरवणे , माजी उपसरपंच गणेश खोले , विक्रम कौठकर ,एकनाथ कर्डिले ,रावसाहेब कर्डिले , प्रगतीशील शेतकरी बबनराव आंबेकर , सेवानिवृत्त शासकिय कर्मचारी दिपक आंबेकर , सेवानिवृत्त वन कर्मचारी नंदू गाडे ,  सुभाष मोरे ,आण्णा कोळपकर , आदी  उपस्थित होते ,

शंकुतला बहेनजी यावेळी म्हणाल्या  की वाढदिवस म्हणजे दुवा आशिर्वाद घेण्याचा दिवस या दुवाच्या आधारे आपले जीवन आधिक सुसह्य होते .चांगले कर्म जीवनात आवश्यक आहे . कपिल मालवी यांनी आंबेकर यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची माहिती दिली . रवींद्र सानप यांनी आंबेकर परीवाराने  अभ्यासिका स्थापन करावी अशी सूचना केली . कल्पना बरमेचा ,संजय बारवकर ,विलास कर्डिले , पडवळ आदीनी यावेळी शुभेच्छा दिल्या. .विलास आंबेकर यांनी केलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली .अज्ञानातुन बाहेर पडण्यासाठी ज्ञानाची कास धरावी असे आवाहन त्यानी  केले .धीरज आंबेकर यांनी आभार मानले .