बसने हुलकावणी दिल्याने दुचाकीस्वार ऊसाच्या बैलगाडीला धडकून जागी ठार
"पैठण तालुक्यातील दादेगाव शिवारतील घटना"
पाचोड(विजय चिडे)पेट्रोल पंप वरून दुचाकीमध्ये पेट्रोल टाकून पाचोड-पैठण रस्त्यावरून घराकडे परतत असणाऱ्या दुचाकीला बसने हुलकावणी दिल्यामुळे दुचाकी रस्त्यावरून ऊसाची वाहतूक करणाऱ्या बैलगाडीला पाठीमागून धडकून दुचाकीस्वार जागी ठार झाल्याची घटना पाचोड-पैठण रस्त्यावरील दादेगाव ता.पैठण शिवारात शनिवारी (दि.१८) रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली असून यात दुचाकीस्वार ओमकार भाऊसाहेब हजारे (वय २०वर्ष ) रा.दादेगाव ता.पैठण हा जागीच ठार झाला आहे.
याविषयी सूत्रांकडुन भेटलेल्या माहीतीनुसार,पैठण तालुक्यातील दादेगाव येथील ओमकार हजारे हा शनिवारी सायंकाळी दावरवाडी येथील पेट्रोल पंपावर दुचाकी क्रमांक (एम.एच.२०जी.पी.५२४७) या दुचाकीत पेट्रोल टाकून घराकडे परत येत असताना पाठीमागून येणाऱ्या बसने ओमकार हजारे याच्या दुचाकीला हुलकावणी दिल्यामुळे त्यांचे दुचाकीवरून नियंत्रण सुटून तो रस्त्यावरून ऊसतोड कामगार हे ऊसाने भरलेले बैलगाडी ट्रक भरण्यासाठी घेऊन जात होते त्या ऊसतोड कामगाराची ऊसाने भरलेली बैलगाडीला पाठीमागून जोरदार धडकला. दुचाकीस्वार ऊसाने भरलेल्या बैलगाडीला धकडताच बस चालक बस घेऊन त्या ठिकाणाहून फरार झाला.मागील तिनं वर्षापूर्वीच पाचोड-पैठण या राज्य महामार्गाचे काम कोट्यावधी रुपये खर्चून करण्यात आले होते.मात्र यावेळी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या रस्त्याच्या दुतर्फा साईट पंखे अत्यंत कमी असल्याने या ऊसाने भरलेले बैलगाड्या रस्त्यावरून जात असतात. या महामार्गावरती यापूर्वी देखील अनेक अपघात घडले आहेत. हा अपघात झाला यावेळी ओमकार हा रक्तबोंभळ झाला होता. हा अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांना या अपघाताची माहिती तात्काळ पाचोड पोलीस ठाण्यात देऊन अपघातांमध्ये जखमी झालेला दुचाकीस्वार ओमकार हजारे यास ताबडतोब एका खाजगी गाडीने पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.बाबर यांनी त्याच्या वरती प्राथमिक उपचार करून त्यास तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवले होते. मात्र उपचारादरम्यान ओमकार हजारे यांची प्राणज्योत माळवली आहे. ओमकार आई-वडिलांसाठी एकुलता एक होता. या अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाल्याने दादेगाव परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार गोविंद राऊत, अफसर बागवान हे करीत आहेत.