शिरुर  : इस्त्रीच्या कपडाच्या पिशवीत आलेले लाख रुपये हून आधिक किमंतीचे दागिने इस्त्री दुकानाचे चालक दत्ता अभंग व दिंगबर अभंग या बंधूने प्रमाणिकपणे ज्याचे दागिने हरविले होते त्याच्या कडे सूपूर्त करुन जगात आजही प्रामाणिकपणा ,सच्चेपणा व निस्वार्थीपणा टिकून असल्याचे दाखवून दिले .त्याच्या या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे .

Sponsored

कृष्णा हाइट्स - कोटा

कृष्णा हाइट्स की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

   याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे येथील डंबेनाला (माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण चौकात ) संतोष लिलाचंद गादिया यांच्या जागेत विनायक ड्रायक्लिनर्स या नावाने अभंग बंधू यांचे इस्त्रीचे दुकान आहे. त्याच्या दुकानात दादाभाउ मंजाभाउ पांढरे रा .गांजी भोयरे , ता . पारनेर ,जि अहमदनगर यांनी इस्त्री साठी पिशवीतून कपडे दिले होते . इस्त्री साठी कपडे दिल्या नंतर इस्त्रीचा पिशवीत त्याना एक मंगलसूत्र व दोन कानातील झूमके ज्याची किमंत एक लाखा रुपये हून आधिक आहे असे दागिने आढळून आले .अभंग बंधू यांनी प्रामाणिकपणे हे दागिने दादाभाउ पांढरे यांच्या कडे सूपूर्त केले . अभंग यांच्या प्रामाणिकपणाबद्दल यशवंतराव चव्हाण सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठान शिरुर व डंबेनाला गणेश मित्र मंडळ शिरुर यांचा वतीने अभंग बंधूचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला . यावेळी बोलताना दत्ता अभंग म्हणाले की वडिलांची शिकवणुक होती खरे पणाने वागायचे. जे आपल नाही ते आपल्या कडे ठेवायच नाही ज्याच आहे त्याला ते द्यायच . मी दागिने परत करुन वेगळ काही केल नाही माझ मी कर्तव्य पार पाडले असे नम्रपणे सांगितले . प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बारवकर , मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब झोडगे ,शिरुर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक नितीन बारवकर , मनसेचे माजी शहरप्रमुख संदिप कडेकर , संतोष गादिया , कन्हैयालाल दुगड . एस टी.तील सेवानिवृत्त आधिकारी संजय कडेकर , राजू शेजवळ , हर्षद उर्फ टिकू ओस्तवाल ,हमीदभाई सौदागर , संतोष शेजवळ संतोष शिंदे आदी उपस्थित यावेळी  होते .  संजय बारवकर व प्रा. सतीश धुमाळ यांनी ही याप्रसंगी  मनोगत  व्यक्त केले .