शिरूर -राज्यस्तरीय आंतरशालेय तलवारबाजी स्पर्धेत बोरा महाविद्यालयाचा सार्थ कुरुंदळे यांस कास्यपदक मिळाले आहे . ५ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर २०२३ दरम्यान क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर द्वारा विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय तलवारबाजी (मुले/मुली) स्पर्धेमध्ये चांदमल ताराचंद बोरा कनिष्ठ महाविद्यालयातील 11 वी विज्ञान शाखेतील पार्थ कुरंदळे व सुमीत कुरुदळे सहभागी झाले होते . त्यात 19 वर्ष वयोगटामध्ये पार्थ कुरुंदळे यांनी कांस्यपदक पटकावले. कुरुंदळे याचे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, अनिल बोरा, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयीन नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश धारीवाल शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम, प्राचार्य डॉ. के.सी. मोहिते, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. पी.एस.वीरकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. डी.के.मांडलिक यांनी अभिनंदन केले. विजेत्या खेळाडूंना प्रा. योगेश आव्हाड, डॉ. ए. एम. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले . फोटो ओळी -राज्यस्तरीय आंतरशालेय तलवारबाजी स्पर्धेत बोरा महाविद्यालयाचा सार्थ कुरुंदळे यांस कास्यंपदक मिळाल्याबद्दल अभिनंदन करताना