शिरुर दिनांक - (वार्ताहर ) वात्सल्यसिंधू  फाऊंडेशन संचालित अन्नपूर्णा धान्य बँक या माध्यमातून ' एक दिवा वंचितांच्या दारी ' हा उपक्रम राबविण्यात येतो . यंदा या उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे . या उपक्रमा मध्ये दिवाळीच्या उटण्या पासून पणती,मोती साबण तेल, तूप, रवा, मैदा,साखर, बेसनपीठ, डाळी असे दिवाळी फराळ बनवण्यासाठी लागणारे साहित्याचे वाटप समाजातील वंचित घटकांना व गरजूना करण्यात येते . .या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन अनेक वंचित कुटुंबाची दिवाळी आपण गोड करू शकता . याकरिता 1550 रू चे किराणा कीट तयार केले आहे हे स्वतंत्र एक कीट तुम्ही देऊ शकता .अन्यथा तुम्हाला जमेल तेवढी रक्कम तुम्हीं कीट साठी देऊ शकता. ही रक्कम संस्थेच्या अकाउंट वर जमा करू शकता असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा सुनंदा लंघे व सचिव उषा वाखारे यांनी केले आहे . आधिक माहिती साठी संपर्क क्रमांक सुनंदा लंघे - मो . 92711 14199 उषा वाखारे - मो . 89286 44866