शिरुर दिनांक ( वार्ताहर ) आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उत्कृष्टता आणि शिस्त अत्यंत महत्वाची आहे. असे प्रतिपादन २ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन चे कमांडिंग ऑफीसर कर्नल बिपिनकुमार मल (सेना मेडल) यांनी केले. येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात कमांडिंग ऑफीसर कर्नल विपिनकुमार मल यांनी भेट दिली तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.सी. मोहिते, राष्ट्रीय सेना अधिकारी यशस्विता वारे व एन.सी.सी छात्र यांच्याशी संवाद साधला. कर्नल बिपिनकुमार मल (सेना मेडल) यांनी छात्रांशी मोकळेपणाने संवाद साधत छात्रसेनेविषयी छात्रांची मते आणि भावना जाणून घेतल्या. महाविद्यालयातील एन.सी. सी. विभाग उत्तरोत्तर प्रगतीपथावर नेण्यासाठी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. के.सी. मोहिते यांनी छात्रांना मोठी स्वप्ने पहा व त्यांचा पाठलाग करा असे सांगून तीनही सेनादलामध्ये महिलांना पुरूषांच्या बरोबरीने संधी उपलब्ध असून छात्रसेनेतील छात्रांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले . यावेळी सुभेदार मेजर राजपाल सिंग, नायब सुभेदार श्रीपती शिंदे व बीएचएम व्ही. आर. गिरी उपस्थित होते . प्रास्ताविक व आभार प्रदर्शन राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी प्रा. यशस्विता वारे यांनी तर सूत्रसंचालन छात्र एसयुओ नेहा कुरंदळे केले.