शिरूर : शासनाच्या विविध खात्याच्या योजना सर्वसामान्यपर्यत पोहचविण्याचा भाग म्हणून शहरातील मदारी वस्तीत महसूल विभाग व वात्सल्यसिंधू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष अभियान राबविण्यात आले. या अभिनया अंतर्गत भटक्या विमुक्त जाती व अनुसूचित जमातीतील कुटुंबातील मतदार नोंदणी मोहीम, दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपयोजिक अभियान, प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भय निधी, आयुष्यमान भारत कार्ड आदी योजना संदर्भात माहिती देऊन याबाबतचे फार्म अन्य बाबींचे संकलन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी हरेश सूळ, मदारी समाजाचे पदाधिकारी चिरागोद्दीन मदारी, हुसेनभाई मदारी, माजी नगरसेवक मुजफ्फर कुरेशी, वात्सल्यसिंधू फाउंडेशनच्या अध्यक्षा सूनंदा लंघे , सचिव उषा वाखारे, शैलेश वाखारे, महसूल अधिकारी नीलेश घोडके, नगरपरिषद कर्मचारी गणेश शेंडगे, महेश गावडे,विजय गायकवाड, बीएलओ अधिकारी पी.ए.कुलकर्णी आदी उपस्थित होते. वात्सल्यसिंधूचा उषा वाखारे यांनी सांगितले की शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यापर्यत पोहोचवून त्याच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी सातत्याने फाउंडेशन विविध उपक्रमांचे आयोजन करीत असते. मदारी वस्तीतील नागरिकांना शासनाच्या विविध योजनाच्या लाभ व्हावा याकरिता महसूल खात्याचा हा उपक्रम राबविण्यात आला. आजच्या या शिबिरात स्वयंघोषणापत्राद्वारे ३० जणांची मतदारनावनोंदणी करण्यात आली . रेशनकार्ड दुरस्ती नवीन नावनोंदणी यासाठी २५ हून अधिक लोकांचे अर्ज प्राप्त झाले. आधारकार्ड अपटेड चे ही काम करण्यात आले.यापुढील काळात ही शासनच्या योजना लाभार्थी पर्यत पोहचविण्याचा दृष्टीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आयुष्यमान भारत कार्ड साठी ३० जणांची केवायसी यावेळी पूर्ण करण्यात आल्याचे नगरपालिकेचे महेश गावडे व गणेश शेंडगे यांनी सांगितले. प्रांताधिकारी हरेश सूळ यांनी मदारी वस्तीत पाहणी केली व आगामी काळात जातीचे दाखले संदर्भात लवकरच शिबीर घेण्यात येईल असे सांगितले