शिरूर  :आदिशक्ती महिला मंडळ हे महिलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे व्यासपीठ बनले असून विविध स्पर्धांच्या माध्यमातून महिलांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळत असल्याचे प्रतिपादन पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी केले.             नवरात्रोत्सवा निमित्त आदिशक्ती महिला मंडळाच्या वतीने येथील रयत शिक्षण संस्थेच्या मैदानावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.जगताप यांच्या हस्ते या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण करण्यात आले.

यावेळी जगताप  म्हणाले आदिशक्ती मंडळाने  महिलाना चूल आणि मूल या साचेबद्ध जीवनातून बाहेर काढून त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याचे व आत्मविश्वास दृढ करण्याचे स्तुत्य काम केले आहे.

 नवरात्रोत्सवा यंदाचे दहावे वर्ष असून महिलांच्या वाढत्या सहभागाने हा आनंदोत्सव बनल्याचे मंडळाच्या संस्थापिका शशिकला काळे यांनी सांगितले.

दरम्यान आकर्षक मंडप,प्रवेशद्वार सुसज्ज व्यासपीठ आणि तेथे विराजमान करण्यात आलेली देवीची सुंदर अशी मूर्ती अश्या मंगलमय वातावरणात विविध स्पर्धा पार पडल्या.यात मिसेस शिरूर या स्पर्धेत अस्मिता ठोकळ यांनी मिसेस शिरूरचा किताब पटकाविला.प्रियंका जाधव यांनी पैठणीच्या मानकरी ठरल्या.दांडिया स्पर्धेत मृणाल कर्डीले,पाककृती स्पर्धेत सविता सोनवणे, फॅन्सी ड्रेस स्पर्धेत गौरी चिंचोलकर,सामूहिक नृत्य स्पर्धेत पंचरत्न ग्रुप नसरीन शेख तर वैयक्तिक नृत्य स्पर्धेत शिल लोंढे यांनी प्रथम क्रमांक मिळविला .माजी जिल्हा परिषद सदस्या  रेखा बांदल,पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील, डॉ.सोनल भालेकर,साधना महासंघाच्या अध्यक्षा साधना शितोळे, आधारछाया फाउंडैशनच्या अध्यक्षा सविता बोरुडे,मीना गवारे,  डॉ .शिल्पा घोडे,कावेरी नाझीरकर, छबुबाई शेंडगे यांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 राही प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मीरा नर्सिंग होमच्या संचालिका डॉ.सुनीता पोटे यांनी महिलांची मोफत सीए -१२५( कॅन्सर तपासणी)तपासणी केली.ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार पाटील यांचे यात सहकार्य लाभले.

प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल, माजी जि. प.सदस्या रेखा बांदल,माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण नगरसेवक विनोद भालेराव उद्योजक किरण पठारे,माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे,डॉ.सोनल भालेकर, डॉ. वर्षा पुजारी, उद्योजक महेंद्र फुलफगर,आनंद फुलफगर,किरण पठारे, रासणे बंधु ,विनय बोरा,वैभव खाबीया,आनंद स्टील सेंटर आमोल माळवदकर, चेतन धोत्रे ,पुजा महाजन, योगिता दिघे,नसरीन शेख यांचे विशेष सहकार्य लाभले.

माजी नगराध्यक्ष सुवर्णा लोळगे,अलका सरोदे,पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील, शहर पंचक्रोशी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कुणाल काळे, डॉ.स्मिता बोरा, डॉक्टर हार्दे, शाहीन पठाण डॉ वैशाली साखरे  यांची यावेळी  प्रमुख उपस्थिती होती.

गेली दहा वर्षांपासून आदिशक्तीच्या संस्थापिका शशिकला काळे,अध्यक्षा  सुनंदा लंघे,उपाध्यक्ष मनीषा कालेवार,सचिव लता नाझिरकर,उषा वाखारे,खजिनदार सुवर्णा सोनवणे, सहखजिनदार कोमल वाखारे,कार्याध्यक्ष निता सतिजा या व त्यांचे सर्व सदस्य नवरात्र उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी नियोजन करीत असतात . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सुनंदा लंघे यांनी केले .