अल्पभूधारक शेतकऱ्याची लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
"पैठण तालुक्यातील आंतरवाली खांडी येथील घटना"
पाचोड प्रतिनिधी विजय चिडे/
कर्जबाजारीपणा कंटाळून पैठण तालुक्यातील आंतरवाली खांडी येथील एका ४५ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.२४) रोजी सकाळी दहा वाजता उघडकीस घडली असून नारायण दगडु सरोदे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.
याविषयी सूत्रांकडुन भेटलेल्या माहीतीनुसार, आंतरवाली खांडी येथील नारायण सरोदे यांच्याकडे ३ एकार शेती असून ते आपल्या शेतामध्ये कपाशी,तूर हे पिके घेत होते. मात्र यंदा पैठण तालुक्यातील दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेतातील पिके वाळून गेले आहे, शेतातील खर्च केलेला ही पैसा वसुल झाला नाही, नारायण सरोदे यांच्याकडे बचत गटांचे दीड लाख एका बीटभट्टी चालकांकडून दोन लाख असे ४ लाख रुपयांचे कर्ज त्यांच्यावर होते हे घेतलेलं कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत नारायण हा होता. मात्र मागील काही दिवसांपासून या पैशासाठी त्यासर्वानी तगदा लावला होता अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. या पैशांच्या तणावामध्ये नारायण सरोदे हा( दि.१७) आक्टोबर पासुन घरातून बेपत्ता होता.
नारायण सरोदे हा बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी पाचोड पोलीस ठाण्यामध्ये दिली होती. मंगळवारी सकाळी दहा वाजता नारायणची आई ही शेतात कापुस वेचणी करण्यासाठी गेली असता त्यांना एका लिंबाच्या झाडाखाली एक मृतदेह आढळला. यावेळी त्यांनी जवळजाऊन पाहीले असता हा मृतदेह नारायणचाच आहे त्यांना कळले यावेळी त्यांच्या आईने हंबाडा फोडला. या घटनेची माहिती गावांतील नागरिकांनी तात्काळ पाचोड पोलिस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांना दिली असता त्यांनी तात्काळ बीट जमादार रविंद्र अंबेकर, हेडकॉन्स्टेबल संदीप जाधव, पोलीस नाईक पवन चव्हाण हे तातडीने घटनास्थळी दाखल होऊन नारायण सरोदे यास एका खाजगी वाहनाद्वारे पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.नोमान शेख यांनी त्यास तपासुन मृत्यू घोषीत करून त्यावर उतणीय तपासणी केली. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार रविंद्र अंबेकर हे करीत आहेत.