शिरुर दिनांक ( वार्ताहर ) लाला सहकारी बॅकेचे माजी अध्यक्ष तात्यासाहेब गुंजाळ यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले . जनता दल धर्मनिरपेक्षचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे , लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक , माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर ,जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर , बॅंकेचे शिरुर शाखेचे व्यवस्थापक राजेंद्र शिंदे , महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरुरचे उपाध्यक्ष प्रा . सतीश धुमाळ , आदी यावेळी उपस्थित होते . नाथा शेवाळे यावेळी म्हणाले की तात्यासाहेब गुंजाळ यांनी राजकारण , समाजकारण ,सहकार व उद्योग व्यवसायात मोठे कार्य केले . सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी त्यांनी काम केले गुंजाळ यांच्या विविध आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या . रवींद्र धनक व सतीश धुमाळ यांचे ही यावेळी भाषण झाले . प्रास्ताविक राजेंद्र शिंदे यांनी तर सुत्रसंचालन व आभार संजय बारवकर यांनी मानले .

फोटो ओळी 

 लाला सहकारी बॅकेचे माजी अध्यक्ष तात्यासाहेब गुंजाळ यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त शिरुर येथे अभिवादन करण्यात आले .