शिरुर दिनांक ( वार्ताहर ) ज्येष्ठ्य नेते व अहमदनगर जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव उर्फ माउली पठारे यांचे निधन झाले आहे . पठारे यांचे परिसरातील धार्मिक ,सामाजिक व राजकिय क्षेत्रात मोठे योगदान राहिले आहे . पारनेर विधानसभेची निवडणुक ही त्यांनी लढविली होती . व्यवसायिक सुरेश पठारे ,गणेश पठारे व किरण पठारे यांचे ते वडिल होत . पठारे यांची अंत्ययात्रा वडुले ता.पारनेर या ठिकाणी रविवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सांयकाळी ६ वा. होणार आहे .