शिरूर दिनांक (वार्ताहर) शिरूर शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम शिरुर नगरपरिषदेच्या वतीने शहरात आज पासुन सुरु करण्यात आली असून पकडण्यात आलेल्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात येणार आहे . सकाळ पासुन २३ हुन आधिक कुत्र्याना पकडण्यात आले आहे .              काही दिवसापूर्वी गुजर कॉलनी परिसरातील एका चार वर्षांच्या मुलास कुत्र्याने चावा घेतल्याने हा विषय पुन्हा चर्चेला आला होता व पालिका भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करणार कधी असा प्रश्न नागरिकान मधून विचारला जात होत्या . दरम्यान काही दिवसात कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी स्मिता प्रदीप काळे यांनी जाहीर केले होते . त्यानुसार आज सकाळ पासून शहरातील गुजर कॉलनी , लाटेआळी व हलवाई चौक , भाजी बाजार या परिसरातील मोकाट व भटक्या कुत्र्याना पकडण्यात आले असून त्याचे निर्बीजिकरण करण्यात येणार असून यापुढील काळात ही मोहीम सुरु राहणार असल्याचे पालिकेचे स्वच्छता आधिकारी दत्तात्रेय बर्गे यांनी सांगितले . आजच्या या मोहिमेत स्वच्छता आधिकारी दत्तात्रेय बर्गे , स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्या अभियंता राजश्री मोरे , मनोज अहिरे , सागर कांबळे याच्यासह ११ जणाच्या टीमच्या समावेश होता असे त्यांनी सांगितले . मागील काही वर्षापासून शिरूर शहरातील विविध भागात भटक्या कुत्र्यांच्या वावर वाढला आहे. शहरातील हुडको कॉलनी, स्टेट बँक कॉलनी, रेव्हन्यू कॉलनी, सैनिक वसाहत, पुणे नगर रस्त्या , पाबळ फाटा, कॉलेज रोड याखेरीज गावठाणातील विविध भागात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या वेगाने वाढली आहे. रात्री व पहाटेच्या वेळी शहरातील विविध भागात ही कुत्री टोळक्याने फिरतात .एका वेळी १० हुन अधिक एकत्रित फिरणारे कुत्र्यान मुळे अनेकांच्या मनात भीतीने धडकी भरते. विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक, आजारी रुग्ण, व दुचाकी वरून जणारे दुचाकीस्वार, पायी चालणारे पादचारी यांना याचा मोठ्या त्रास होतो. ही कुत्री अचानक अंगावर धावून येणे, दुचाकीस्वारांच्या पाठलाग करणे, जोर जोरात अंगावर धावून येवून भुंकणे, या सा-यांचा त्रास पहाटेच्या वेळी ट्युशन व शाळेसाठी घरा बाहेर पडणारे शाळकरी मुले, व्यायामासाठी बाहेर पडणारे व्यायामप्रेमी, कामासाठी बाहेर पडणारे व रात्री उशिरा परत घरी येणारे कामगार, याखेरीज नागरिकांना या भटक्या कुत्र्यांच्या मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. अनेक वेळ्या ही कुत्री पाठीमागे लागल्याने दुचाकीस्वार गाडीवरून पडून जखमी होण्याचे प्रकार ही घडले आहेत. लहान मुले ही कुत्रे मागे लागल्याने घाबरून पळत असताना पडून दुखापतग्रस्त झाले आहेत. यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. दिवसागणिक शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढता वावर लोकांची काळजी वाढविणारा आहे. काही महिन्यापूर्वी शहरात एक नऊ वर्षीय मुलांचा ही कुत्र्या चावल्याने मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांच्या विषय चर्चेला आला होता. दिवसापूर्वी गुजर कॉलनीतील आयुष भास्कर हरिहर या चार वर्षाच्या मुलास भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने तो जखमी झाला होता .या घटनेनंतर शहरातील मोकाट व भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त होणार तरी कधी असा सवाल नागरिकांतून विचारला जात होता .

चौकट

 मुख्याधिकारी स्मिता प्रदीप काळे यांनी सांगितले की शिरूर नगरपरिषदेने शहरातील कुत्र्यांच्या निर्बीजीकरण करण्यासंदर्भात चार वेळ्या टेंडर काढले होते. पण कोणीच त्यास प्रतिसाद दिला नाही. आता पाचव्या वेळेस टेंडर काढले त्याला प्रतिसाद मिळाला . यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण होऊन मोकाट व भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणास सुरुवात करण्यात आली आहे .

फोटो ओळी –

 शिरूर शहरात भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या वावर वाढल्याचा घटने नंतर आज पासुन शिरुर शहरात भटक्या व मोकाट कुत्र्याना पकडण्याची मोहीम सुरु करण्यात आली .