शिरुर दिनांक ( वार्ताहर ) 'रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथे पार पडलेल्या 'स्वररंग 2023' या जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवात सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर च्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.     एकपात्री अभिनयामध्ये कु· क्षितीजा खरात हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषीक पटकावले .विकी होगे या विद्यार्थ्याने पोस्टर मेकींग मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. कु. तेजस्वी बांदल हिने चिकट कला व कात्रण स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला तर सौरभ मोरे या विद्यार्थ्यांने स्थळ छायाचित्रण या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग समन्वयक  मोनाली परभाणे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र थिटे, सचिव धनंजय थिटे व प्राचार्य डॉ. द्वारकादास बाहेती यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी बोलताना डॉ. राजेंद्र थिटे यांनी सांगितले की, संस्था विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यास नेहमी प्राधान्य देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असते.