पावसात वीज कोसळून मराठवाड्यातीलठार;

"नांदेडछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १० जनावरं वीज पडून दगावली"

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी/ हवामान विभागाने मराठवाड्यात पावसासह वादळी वाऱ्यांचा शक्यतेचा अंदाज वर्तविला होता हा अंदाज तंतोतंत खरा ठरत आहे. मागील पाच सहा दिवसांपासून मराठवाड्यात कुठे जोरदार, तर कुठे हलकासा पाऊस पडत आहे. तर मराठवाड्यात दोन दिवसांत वीज कोसळुन ५ जणं ठार झाले आहेत नांदेड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १० जनावरं वीज पडून दगावली आहे. शुक्रवारी बीड जिल्ह्यातील संगीता मच्छिंद्र कराड या शेतात काम करताना वीज पडून मृत्यू तर नांदेड जिल्ह्यातील साईनाथ दत्ता घुगे देखील शेतात काम करीत असताना अचानक वीज पडून ते जागीच ठार झाले आहे तर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील माय लेकी सविता विठ्ठल कतारे व त्यांची मुलगी निकिता विठ्ठल कतारे या माय-लेकीचा वीज अंगावर पडल्याने जागीच मृत्यू झाला , भेंडेवाडी ओंकार किशन घुगे यांच्या ही अंगावर विज पडून तोही हा सुद्धा मरण पावला आहे.तर नांदेड जिल्हात पुराच्या पाण्यात १०० हेक्टर क्षेत्रावरील कापूस, हळद पीक क वाहून गेले आहे.