पाचोड परिसरात विजेच्या लपंडावाने नागरिक वैतागले!

"महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास"

पाचोड/प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून पाचोडसह परिसरातील अनेक गावांत दिवसातून अनेक वेळा विद्युतपुरवठा खंडित होण्याचा प्रकार वाढला आहे तर काही ठिकाणी विजेचा पुरवठा कमी येत असल्याने घरांतील फँन, फ्रीज, टिव्ही असे अनेक वस्तू यामुळे खराब झाल्या आहेत तसेच हा खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे परिसरातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मागील चार दिवसापासून पाचोड परिसरात पावसाने हजेरी लावली असल्याने ठिक ठिकाणी डांसाची उत्पती झाली आहे. त्यामुळे घरात फँन ची गरज भासत आहे. परंतु पाचोड सह विजेची समस्या असल्याने नागरिक भलते च वैतागून गेले आहेत. सध्या परिसरात विजेचे कुठलेच वेळापञक राहिलेले नसून "विज कधी येईल अन् कधी" जाईल हे सांगणे अवघङ झालेले आहेत.

विजेची दिवसा लपंडाव तर असतेच परंतु राञी अपराञी पण विज तासन् तास गुल असते. त्यामुळे नागरिक रडकुंडीस आले. वीज नसल्यावर घरात डासांचा सामना करावा लागतो. त्यात सद्या वातावरणात भितीचे आसल्याने नागरीकाला त्रस सहन करावा लागत आहे. पाचोडच्या बागवान गल्ली,फाजलपुरा, कल्याणनगर, शिवाजीनगर बसस्थानक भागात तर विज असूनही नागरीक परीक्षाण होताना दिसुन असुन या भागात विजेचा पुरवठा कमी येत असल्याने लाईट डीम असते घरात लाईट असल्यासारखी वाटत नाही.

सतत फ्यूज जाण्याच्या घटनेत वाढ होत आहे. साधे फ्यूज गेल्यावर नागरिकांना तासंतास वीज येण्याची वाट बघावे लागते.याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांना काहीच देणे घेणे नाही. ते जेव्हा दुरुस्ती करतील, तेव्हा करतील. त्यांना नागरिकांनी जाब विचारू नये, असे येथील अधिकाऱ्यांचे वर्तन आहे.सद्या पाचोड येथील वीज कार्यालयात मनमानी कारभार सुरू असून वरिष्ठांचे कर्मचाऱ्यावर अंकूश नसल्याने भोंगळ कारभार सुरु आहे. डीपीमध्ये राञीच्यावेळी शुल्लक अडचण निर्माण होऊन लाईट गेलीली तीच सकाळी येते. तोपर्यंत नागरिकांना राञ अंधारात घालावी लागते. विजेच्या बाबतीत विचारले की,लाईट वरून गेलेली आहे.असे सांगून नागरीकांची दिशाभूल करून वेळ मारून घेतले जाते.विद्युत महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी विजेच्या समस्येच्या बाबतीत लक्ष केंद्रित करुन अडचण सोडवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.