राज्य उत्पादन शुल्क विभागानी 116 हिरवी गांजाची झाडे केली जप्त ;25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त ..

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी/

छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव येथील दोन व्यक्तीने त्यांच्या शेतातील तुर व कपाशीच्या आंतरपिकामध्ये गांज्याची झाडांची अवैध व बेकायदेशिररितया चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने मोठया प्रमाणावर लागवड केली होती. याची माहिती छत्रपती संभाजीनगरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांला गुप्त बातमीदार मार्फत भेटली असता त्यांनी तात्काळ पथकासह अचनाक छापा मारला असता योगेश गौतम वाघ यांच्या शेतात 53 गांजाची झाडे सापडली तर आसाराम मोतीराम बहुरे यांच्या शेतात 63 जिंवत सहा फुट बोंड आलेली गांजाची झाडे आढळून आली आहे. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी योगेश गौतम वाघ या पडकले आहे तर आसाराम मोतीराम बहुरे हा फरार झाला आहे. याबाबत अधीक माहीती अशी की, राज्य उत्पादन शुल्क् छत्रपती संभाजीनगर विभागास मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे राज्य् उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त मा. डॉ. विजय सुर्यवंशी, मा. संचालक सुनिल चव्हाण, छत्रपती संभाजीनगर विभागाचे मा. विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार, मा. अधीक्षक संतोष झगडे, मा. उप-अधीक्षक शरद फटांगडे यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक भरारी पथक राज्य् उत्पादन शुल्क छत्रपती संभाजीनगर व निरीक्षक अ विभाग व व विभाग यांनी बोधेगाव (बु) ता. फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर गट क्र - २८१ मधील योगेश गौतम वाघ व गट क्र- ४१८ मधील आसाराम मोती बहुरे याचे कपाशी व तुरीच्या शेतात छापा टाकुन मोठया प्रमाणावर सहा फुट उंचीची फुले व बोंडे असलेली एकुण ११६ जीवंत गांजाची झाडे जप्त केली आहे. योगेश गौतम वाघ याचे शेतातुन ५३ गांजाची झाडे व आसाराम मोती बहुरे याचे शेतातुन ६३ गांचाची झाडे जप्त् करण्यात आली आहे. आसाराम मोती बहुरे यांचा मुलगा शुभम उर्फ बबलु आसाराम बहुरे याने सदर शेतात गांजाच्या झाडाची लागवड केलेली होती तसेच योगेश गौतम वाघ याने त्याच्या कुटुंबातील सामाईक क्षेत्रातील त्याचे ताबेकब्जात असलेल्या कपाशी व तुरीच्या शेतात गांजा झाडांची लागवड केलेली होती. सदर प्रकरणी एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये दोन गुन्हे नोंदवण्यात आले असुन दोन्ही गुन्हयातील मुद्देमालाची किंमत सुमारे २५ लाख इतकी आहे. सदर गुन्हयात योगेश गौतम वाघ यास अटक करण्यात आलेली असुन शुभम उर्फ बबलु आसाराम बहुरे हा फरार आहे. सदरच्या छापा पथकात मा. अधीक्षक संतोष झगडे, प्र. उप-अधीक्षक शरद फटांगडे, निरीक्षक भरारी पथक राहुल गुरव, अ विभागाचे निरीक्षक आनंद चौधरी यांचे सह दुय्यम निरीक्षक गणेश पवार, गणेश इंगळे, शरद रोटे, अरुण तातळे, बालाजी वाघमोडे, गणेश उंडे, पी.बी. साबळे, ए.टी.निमगीरे, ए.ओ. गायकवाड. पी.आर.माळी, व्ही. जी. साळुंके, एस.एस. कोकाटे, कुमारी ए.बी.म्हस्के, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश नागवे, प्रविण पुरी, रामजीवन भारती, सुभाष गुंजाळे जवान हर्षल बारी, कुष्णा पाटील, चेतन वानखेडे, रविंद्र मुरडकर, सुनिल दामधर, भैय्यासाहेब किरवले, श्रावण खरात, विजय पवार, अमित नवगीरे व महीला जवान बेबी नलावडे, अश्वीनी बोंदर जवान नि वाहन चालक शिवशंकर मुपडे, किशोर सुंदर्डे, सचिन पवार, विनायक चव्हाण व संजय गायकवाड यांचा सहभाग होता.सदरील गुन्हयांचा पुढील तपास भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक शरद रोटे व अरुण तातळे हे करीत आहे. ________