शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक आयुबभाई सय्यद यांच्या सेवानिवृत्ती निमित्त माजी नगराध्यक्ष व उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . यावेळी मुख्याधिकारी स्मिता प्रदीप काळे ,शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड . सुभाष पवार , माजी नगराध्यक्षा वैशाली वाखारे ,उज्जवला बरमेचा , अलका सरोदे ,सुवर्णा लोळगे , सुवर्णा दिवटे ,माजी नगराध्यक्षा रवींद्र ढोबळे ,माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण , शिवसेनेचे शहर प्रमुख संजय देशमुख ,मयूर थोरात, लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक ,भाजपाचे शहराध्यक्ष नितीन पाचर्णे ,राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहरा ध्यक्ष शरद कालेवार , माजी नगरसेविका ज्योती लोखंडे , रोहिणी बनकर , विनोद भालेराव , मंगेश खांडरे , विठ्ठल पवार, मुन्ना शेख , ॲड . माया गायकवाड ,कविता वाटमारे , संगीता शेजवळ , अभिजीत पाचर्णे ,नीलेश गाडेकर , मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे , माजी सभापती संतोष शितोळे ,माजी उपसभापती अभिजीत आंबेकर , विजय नरके ,नीलेश जाधव , सुनील करळे ,अनिल चव्हाण , राहूल पिसाळ , प्रमोद पवार ,आप्पा पोटघन , दत्तात्रय बर्गे , द. पि जाधव , मुख्याध्यापक संजय वाघ , अशोक मानमोडे , प्रमोद गायकवाड , दत्ता क्षीरसागर , बबन कांबळे , रामभाउ झेंडे , मितेश गादिया , विनोद उबाळे ,वर्धमान रुणवाल , चंद्रकांत पठारे , भगवान दळवी , संतोष फुलडहाळे आदी यावेळी उपस्थित होते . यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष प्रकाश धारीवाल म्हणाले की माझ्या नगरपरिषदेच्या कार्यकिर्दीत सय्यद यांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले . आयुबभाई यांची लेखणी व एखाद्या महत्वाचा मुद्दा कमीत कमी शब्दांत मांडण्याची त्याची हातोटी विलक्षण आहे . शिरुर नगरपरिषदेच्या कामा बरोबरच सय्यद यांनी निवडणुक आयोगाची कामे ही चांगल्या पध्द्तीने केली . आपले काम प्रामाणिकपणे सय्यद करीत असतात .नगरपालिकेच्या कामाच्या त्याना प्रदीर्घ असा अनुभव असल्याचे धारीवाल म्हणाले . नगरपरिषदेचे काम करीत असताना प्रशासनासह समाजातील विविध घटकाच्या मिळालेल्या सहकार्यातुन विविध विकासकामे मार्गी लावू शकल्याचे धारीवाल म्हणाले . मुख्याधिकारी स्मिता प्रदीप काळे म्हणाल्या की आयुब सय्यद यांच्या सारखे आधिकारी पालिकेच्या ठेवा आहे शहरातील नागरिक व प्रशासन यांच्यात त्यांनी चांगल्या समन्वय ठेवला होता . शासकीय नियमांचे पालन करीत लोकाना विविध प्रकारच्या सुविधा कश्या मिळतील हे पाहणे महत्वाचे आहे . आयुब सय्यद यावेळी म्हणाले की माझ्यावर लोकप्रतिनिधीनी दाखविलेल्या विश्वास व सहकारी आधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे पालिकेतील कार्यकिर्द यशस्वीपणे पूर्ण करु शकलो . माजी नगराध्यक्ष प्रकाश धारीवाल सेवापूर्ती कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल त्यांची त्याचे विशेष आभार मानले. त्याच बरोबर पालिकेतील आधिकारी सुनील करळे ,सुभाष शिंगवी , बाळासाहेब काळे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भूषण कडेकर यांनी मानले .