आजादी का अमृत महोत्सव निमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र आरमोरी तथा आरमोरी पंचायत समितीला महामहिम राष्ट्रपती जी यांची फोटो आमदार कृष्णा गजबे यांच्याकडून सप्रेम भेट देण्यात आली
आरमोरी:
आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त भारताचे नवनियुक्त महामहिम राष्ट्रपती जी आदरणीय द्रोपदी मुर्मुजी यांची फोटो औद्योगिक प्रशिक्षण संस्था आरमोरी व शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र तथा पंचायत समिती आरमोरी ला आमदार कृष्णा गजबे यांच्याकडून सप्रेम भेट देण्यात आली. यावेळी आमदार कृष्णा गजबे, तहसिलदार कल्यानकुमार डाहट, बिडिओ हिवंजेजी, पारधी विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी कोकुर्डे,औद्योगिक प्रशिक्षण संस्था आरमोरीचे कर्मचारी व शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र आरमोरी चे कर्मचारी तसेच पंचायत समिती आरमोरी कर्मचारी वृंद उपस्थित होते.