दावरवाडी येथे २५ वर्षीय युवकांची गळफास घेऊन आत्महत्या
पाचोड/एका पंचवीस वर्षीय युवकांने नदीच्या काठावरील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.२५)रोजी सकाळी सहाच्या दरम्यान दावरवाडी ता.पैठण येथे उघडकीस आली असून अनिल श्रीधर काळे (वय२५)असे आत्महत्या केलेल्या युवकाचे आहे. अनिल काळे याने आत्महत्या का ? केली हे अद्यापही संमजू शकलेले नाही.
याविषयी सूत्रांकडुन भेटलेल्या माहीतीनुसार,
अनिल काळे हा एक ट्रकर ड्रायवर म्हणून काम करत होता. रविवारी रात्री तो घरातुन कोणालाही काही न सांगता घराबाहेर पडला. सोमवारी सकाळी घरातील सदस्य उठल्यावर त्यांना अनिल घरात दिसला नाही. मात्र सकाळी गावातील काही नागरीक हे गावालगतच्या नदीकाठावर गेले असता त्यांना अनिलने एका लिंबांच्या झाडा गळफास घेतल्याचे निदर्शनास आले त्यानंतर त्यांने या घटनेची माहीती स्थानिक नागरिकांसह पाचोड पोलिस ठाण्यांत या घटनेची माहीती बीट जमादार आन्नासाहेब गव्हाणे,संदीप जाधव यांना कळविले असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन अनिल काळे यासं लिंबाच्या झाडाच्या खाली उतारून पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखले केले असता कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित करून उत्तणीय तपासणी करण्यात आली असुन या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली असुन पुढिल तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहे.