कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थिनी श्रद्धा हिरालाल पाटील हिचा भारत देशाचे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती शिरुर शिक्षण विभाग यांच्या वतीने स्वराज्य महोत्सव उपक्रम अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत इयत्ता ३ री ते ५ वी च्या गटात प्रथम क्रमांक आला असल्याचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुसुम बांदल यांनी सांगितले.
या यशाबद्दल तिचे केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर, सरपंच अमोल गव्हाणे, उपसरपंच शिल्पा फडतरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ राऊत, उपाध्यक्षा दमयंती कांचन, सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ यांनी कौतुक करत अभिनंदन केले. तसेच पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
तिला वर्गशिक्षक सुरेश सातपुते व मुख्याध्यापिका कुसुम बांदल यांनी मार्गदर्शन केले.