मांजरी येथील पूल वाहतुकीस तात्पुरता बंद

केसनंद /प्रतिनिधी

राज्यामध्ये कालपासून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे त्यामुळे खडकवासला धरणातून मुळा मूठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होत असल्याने पाणी नदीच्या पुलावरून वाहत आल्याने मांजरी खु.- मांजरी बु. या दोन्ही गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला असून लोणीकंद व हडपसर पोलीस प्रशासनाने खबरदारी व सुरक्षेच्या कारणास्तव येजा करण्यासाठी येथील पूल वाहतुकीस तात्पुरता बंद केला आहे.या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचाकांनी व नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन लोणीकंद पोलीस तसेच हडपसर पोलीस व संमधीत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.