शिरुर दिनांक ( वार्ताहर ) प्रत्येक गोष्टी मागील कार्यकारण भाव समजुन घेवुन त्याबद्दलचे कुतुहल जाणुन घेण्यासाठी विद्यार्थ्यानी जास्तीजास्त प्रश्न विचारावेत अशी अपेक्षा छत्तीसगडचे नगरविकास विभागाचे सचिव डॉ .आय्याज तांबोळी यांनी व्यक्त केली . येथील व्हीजन इंटरनॅशनल स्कूलचा वतीने प्रशासकिय क्षेत्रात कार्यरत असणा-या प्रशासकिय आधिकारी व स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्यांच्या सन्मान करण्यात आला . छत्तीसगड येथील नगरविकास खात्याचे सचिव डॉ . आय्याज तांबोळी ,सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे ओएसडी डॉ .सुनील शेळके ,नायब तहसिलदार स्नेहा गिरगोसावी , महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अवघ्या २१ व्या वर्षी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तेजस चिखलीकर व पूजा पंदरकर , शुटिंग एअररायफल्स क्रीडा प्रकारात राष्ट्रीय पातळीवर निवड झालेले चंद्रकांत सातकर ,हर्षल वाळके या शालेय विद्यार्थी यांच्या सन्मान करण्यात आला . विद्यार्थ्यान समवेत संवाद साधताना तांबोळी म्हणाले की आपल्यातील कुतहुल जागृत ठेवून विद्यार्थ्यानी विविध प्रश्न आपल्या शिक्षकांना आई वडिलाना विचारा विविध गोष्टीन मागील कार्यकारण भाव काय . हे अस का असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाले पाहीजेत . असे तांबोळी म्हणाले . संस्थेचे अध्यक्ष विकास पोखरणा , सुवालाल पोखरणा , समर्थ पॅथालॉजीचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते उदय शिंदे , बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर चिखलीकर गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर आदी यावेळी उपस्थित होते . यावेळी प्रास्ताविक संस्थेचे प्रमुख विकास पोखारणा यांनी केले संस्था राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली . स्वागत प्राचार्या मिस. पसक्कीन काशी यांनी केले . सुत्रसंचालन प्रा . सतीश धुमाळ यांनी केले . आभार प्रा. अलका बेलोटे यांनी मानले . फोटो ओळी व्हीजन इंटरनॅशनल स्कूलचा वतीने प्रशासकिय क्षेत्रात कार्यरत असणा-या प्रशासकिय आधिकारी व स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्यांच्या सन्मान करण्यात आला

Sponsored

कृष्णा हाइट्स - कोटा

कृष्णा हाइट्स की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |