शिरुर दिनांक ( वार्ताहर ) गणेश उत्सव व ईद इ मिलाद च्या निमिताने उद्या गुरुवार दि 14 संप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी साडेचार वाजता शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन शिरुर तहसिल कार्यालयाच्य तीसरा मजलावरील हॉल मध्ये करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिली . बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक मीतेश घट्टे ,उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के ,शिरुर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी काळे मॅडम ,व इतर शासकीय विभागाचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत . बैठकीस सर्व आजी ,माजी नगरसेवक ,शांतता कमिटी सदस्य, व गणेश मंडळ प्रमुख पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे .