शिरुर दिनांक ( वार्ताहर ) मराठा समाजाला आरक्षण मिळावे व जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण आंदोलन सुरु केलेले मनोज जरंगे पाटील याना पाठिंबा देण्याकरिता मराठा क्रांती मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांनी शिरुर तहसिल कार्यलयाच्या आवारात एकदिवसाचे लाक्षणिक उपोषण आंदोलन केले . एकदिवसीय उपोषण आंदोलनात वैशाली गायकवाड , राणी कर्डिले ,शशिकला काळे , सुवर्णा सोनवणे ,शृतिका झांबरे यांनी सहभाग घेतला . यावेळी मराठा समाजास आरक्षण तातडीने जाहीर करावे अशी आग्रही मागणी करण्यात आली . सायंकाळी नायब तहसिलदार स्नेहा गिरीगोसावी व पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या हस्ते लिंबू सरबत घेवुन हे उपोषण सोडण्यात आले . दरम्यान दिवसभरात उपोषण स्थळी विविध संस्था संघटना यांच्या प्रतिनिधीनी भेट देवुन आंदोलनकर्त्यास पाठिंबा दिला . यावेळी जिजामाता सहकारी बॅकेच्या संचालिका मनिषा कालेवार ,जिल्हा परिषद माजी सदस्या कोमल वाखारे ,संगीता शेवाळे , शोभना पाचंगे ,संगीता रोकडेज्योती हांडे ,राजश्री ढमढेरे,सविता बोराडे ,जिजामाता सहकारी वॅकेच्या संचालिका मनिषा कालेवार ,जिल्हा परिषद माजी सदस्या कोमल वाखारे ,उमेश शेळके ॲड रवींद्र खांडरे ,रमेश दसगुडे रुपेश घाडगे , अविनाश घोगरे ,कुणाल काळे ,डॉ सुभाष गवारी ,गणेश जामदार, डॉ वैशाली साखरे, रावसाहेब चक्रे   आदी उपस्थित होते . फोटो ओळी मराठा क्रांती मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यानी मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात एक दिवसाचे उपोषण आंदोलन केले .