पैठण : मराठवाडा पदवीधर शिक्षकमतदारसंघाच्या होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी पदवीधर शिक्षकांची मतदान म्हणून नोंदणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने व्यापक प्रमाणात नोंदणी अभियान हाती घेण्यात आले असुन लवकरच या नोंदणीला सुरुवात होणार आहे.या नोंदणीसाठी भाजपाच्या वतीने पैठण तालुका संयोजक म्हणून प्रा.हरिपंडीत नवथर तर सहसंयोजक म्हणून गजानंद बोहरा यांची निवड करण्यात आली आहे.विधान परिषदेच्या स्थापनेपासून मराठवाडा पदवीधर व मराठवाडा पदवीधर शिक्षक हे मतदान संघ भाजपात राहिले आहेत.त्यामुळे भाजपा विचाराचा मोठा मतदार या मतदारसंघात आहे. त्याची व्यापक प्रमाणात नोंदणीचा संकल्प भाजपाच्या वतीने करण्यात आला आहे.तसेच मतदारांना भाजपा सरकारने केलेल्या जनकल्याणकारी कार्याची माहिती देऊन त्यांना त्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीलाच पसंती क्र1 चा पक्ष म्हणून देण्याचे आव्हान केले जाईल असे या निमित्त संयोजक प्रा.हरिपंडीत नवथर व सहसंयोजक गजानंद बोहरा यांनी सांगितले.या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या सर्व जिल्हा पदाधिकारी आणि तालुका पदाधिकारी मित्र मंडळींंनी प्रा. नवथर व सहसंयोजक गजानंद बोहरा यांचे अभिनंदन केले.